बोगस शिक्षक भरती प्रकरणी माजी शिक्षण अधिकारी शैलजा दराडे यांच्यावर गुन्हा

भावावर फसवणूकीचा आरोप

बोगस शिक्षक भरती प्रकरणी माजी शिक्षण अधिकारी शैलजा दराडे यांच्यावर गुन्हा

पुण्यात तब्बल ४५ जणांना शिक्षक म्हणून नोकरी देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्षण परिषदेच्या माजी शिक्षण अधिकारी आणि परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे आणि त्यांच्या भावावर या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल गुन्ह्याची नोंद झाल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूणे तिथे काय उणे असे असताना पुणे हे शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखले जाते, पण शिक्षकपदाची नोकरी देण्याच्या बहाण्याने तब्बल ४५ जणांची लाखो रुपय घेऊन फसवणूक झाल्याने एकाच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात पाषाण पुणे येथे राहणाऱ्या परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे यांना आणि त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे यांना राहणार अकोले , इंदापूर पुणे यांच्यावर हडपसर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली जिल्ह्यातील एका ५० वर्षीय महिलेने हडपसर पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल केला आहे.  हि घटना १५ जून २०१९ ते आत्तापर्यंत घडली आहे. तक्रारदार महिलेने शैलजा रामचंद्र दराडे उर्फ खाडे आणि त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे या दोघा बहीण भावंडांनी शिक्षक म्हणून नोकरी देतो असे खोटे सांगून लाखो रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांच्या दोन वहिनींना शिक्षक पदावर नोकरी लावतो असे सांगत. त्यांच्याकडून प्रत्येकी १२ लाख आणि १५ लाख रुपये असे एकूण २७ लाख रुपये घेतले.

हे ही वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्र्यांची मांदियाळी

मोदींबाबत अपशब्द वापरणारे पवन खेरा शरण आले; मागितली बिनशर्त माफी

एनआयएची मोठी कारवाई, ८ राज्यात ७६ ठिकाणी छापे

दीड लाखांची ब्रँडेड चप्पल, महागड्या जीन्स.. गुंड सुकेश चंद्रशेखरची गजाआड मजा

त्यानंतर फिर्यादी हे कधी नोकरी लागणार या आशेत सतत संपर्क करत होते. मात्र, त्यांना आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे त्यांनी काम होणार नसल्यास पैसे परत मागितले मात्र वारंवार पैसे परत मागितले तरी फिर्यादी महिलेला पैसे परत दिलेच नाहीत. म्हणूनच फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फियादी महिलेने हडपसर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. दरम्यान आरोपीनी अशाच प्रकारे अजून ४५ जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास हडपसर पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. थोरबोले करत आहेत.

दरम्यान , या प्रकरणी आयुक्त शैलजा दराडे म्हणाल्या कि, हा सर्व प्रकार माझ्या भावाने केला आहे. माझ्या पदाचा गैरवापर हा त्याने माझ्या भावाने केला आहे. हा प्रकार समजल्यावर त्यांनी वर्षभरापूर्वीच त्याच्याशी संबंध तोडलेले आहेत असे त्या म्हणाल्या . दादासाहेब दराडे हा माझा सख्खा भाऊ असल्याचा त्याने गैरफायदा घेतला आहे. लोकांना माझ्या पदाचा तो अशाप्रकारे गैरवापर करतो. काम करतो असे सांगून पैसे घेतो म्हणूनच मी संबंध तोडले आहेत. म्हणूनच दादासाहेब दराडे भाऊ असल्याच्या नात्याने कोणीही त्याच्याबरोबर कसलाच व्यवहार करू नये म्हणून ऑगस्ट २०२० मधेच जाहीर नोटीस काढल्याचे शैलजा दराडे म्हणाल्या आहेत.

 

Exit mobile version