एका खाजगी यु ट्यूब वाहिनीवर डॉक्टराची बदनामी करून डॉक्टरांविषयी जनतेत गैरसमज निर्माण केल्याप्रकरणी हास्यकलाकार सुनील पाल याच्याविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट या संघटनेच्या अध्यक्षांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. या व्हीडिओमध्ये डॉक्टरांबद्दल काही अपशब्द वापरल्याचा तसेच गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे.
हे ही वाचा:
कोविडविरूद्धच्या लढ्यातील गुंतवणुक यापुढे सीएसआर
देशमुखांविरुद्धच्या गुन्ह्यातील काही भाग वगळा!
बंगालमधील राजकीय हिंसा संपवण्यासाठी भाजपाची शपथ
ठाकरे सरकारने मराठा आरक्षण विषयाचे फक्त राजकारण केले
कोरोनाच्या या संकटकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांविषयी एका यूट्युब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हस्यकलाकार सुनील पाल याने आक्षेपार्ह विधान करून डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्राविषयी जनतेच्या मनात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. या व्हीडिओत त्याने डॉक्टरांवर अनेक निराधार आरोप केले शिवाय नंतर एका वृत्तवाहिनीवर त्याचे समर्थनही केले होते. काही डॉक्टरांकडून गैरकृत्य केले जात असल्यामुळे आपण आपले मत व्यक्त केल्याचे पालने या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वक्तव्याचे समर्थनही केले होते. हा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केल्याचे असोसीएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट या संघटनेच्या अध्यक्षा सुष्मीता भटनागर यांच्या लक्षात आले.
त्यांनी हा व्हीडिओ पूर्णपणे बघून त्यात सुनील पाल याने डॉक्टराच्या बाबतीत आक्षेपार्ह भाष्य केले. तसेच वैद्यकीय क्षेत्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे डॉक्टर संघटनेच्या लक्षात आले. सुनील पाल यांच्या या विधानाने जनतेत डॉक्टरांविषयी आणि वैद्यकीय क्षेत्राविषयी गैरसमज पसरवल्याप्रकरणी डॉक्टर संघटनेच्या अध्यक्ष डॉक्टर सुष्मीता भटनागर यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली .या तक्रारीवरून पोलिसांनी सुनील पाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती अंधेरी पोलिसांनी दिली.
Vdo बघितला नसला तरी एक मात्र खरंय ते म्हणजे, सध्या hospital आणि वैद्यकीय व्यवसायातील लोकांनी चालवलेली जनतेची लूट, बऱ्याच प्रमाणात याला doctor सुद्धा जवाबदार आहेत