राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अनिल देशमुखांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. जळगाव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप करण्यात येत असून याचं प्रकरणी सीबीआयने अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल केला आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना अनिल देशमुख हे गृहमंत्री होते. त्याच काळात जळगाव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल देशमुखांनी गृहमंत्री असताना जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप आहे. स्वतः प्रवीण मुंढे यांनी सीबीआयकडे जबाब नोंदवला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सीबीआयने यात अनिल देशमुखांना आरोपी बनवल आहे, याआधी या गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण आणि इतर आरोपी होते. पोलीस अधिकारी प्रवीण मुंढे यांनी अनिल देशमुखांच्या विरोधात जबाब दिला होता. त्यानंतर, सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी गिरीश महाजन यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. विरोधी पक्षनेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे आणि विशेष सरकारी वकील असणारे प्रवीण चव्हाण यांच्या दोघातील रेकॉर्डिंगचा एक पेन ड्राईव्ह देखील विधानसभा अध्यक्षांना दिला होता. याच प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा :
मुंबईतील तबेल्यांचे पालघरला स्थलांतर नको, आरेत जागा द्या !
संग्रहालयातून १५ कोटींच्या वस्तू चोरल्या; पण चोर २५ फूट भिंतीवरून कोसळला!
संख्याबळाच्या आधारेच मुख्यमंत्री ठरणार!
सहा दिवसांमध्येचं पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात २० पदके!
दरम्यान, अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ट्वीट केले आहे. तसेच हा गुन्हा तथ्यहीन असल्याचा दावा अनिल देशमुखांनी केला आहे. कटकारास्थानातून हा गुन्हा नोंद झाल्याचेही ते म्हणाले आहेत.