ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. करोना काळात ऑक्सिजन प्रकल्प कंत्राटात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे रोमीन छेडा, महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोमीन छेडा हे आदित्य ठाकरेंचे निकवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलचा खुलासा केला. यापूर्वी रोमिन छेडाला मुंबईच्या राणीबागेत पेंग्विन आणण्याचं कंत्राट देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु, त्याला विरोध झाल्यानंतर रोमिन छेडाला ब्लॅकलिस्ट केलं होतं. परंतु, त्याच रोमिन छेडाच्या कंपनीला उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या १३ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट सुरू करण्याचं कंत्राट दिलं गेलं. त्यासाठी १४० कोटी रुपये देण्यात आले होते.
रोमिन छेडा याने पैसे घेतले आणि केवळ ३८ कोटींचे प्लान्ट उभारले. तसेच १०२ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याशिवाय रोमीन छेडाला कॉन्ट्रॅक्ट देणारे पालिका आयुक्त इक्बाल चहल यांचीही चौकशी व्हायला हवी, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
करोना काळातील अनेक कथित घोटाळे समोर आले असून सध्या तपास यंत्रणांकडून याबद्दल तपास सुरू आहे. डेडबॉडी बॅगच्या खरेदीत कथित घोटाळा झाल्याच्या आरोपावरून सध्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरू आहे. कोविड काळात मुंबई महापालिकेकडून पालिकेच्या रुग्णालयांसाठी मृतदेहांच्या बॅग खरेदी करताना अतिरिक्त किंमत मोजून बॅग विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सुचनेनुसार हा व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
आठ माजी नौदल कर्मचाऱ्यांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधातील भारताचे अपील कतारने स्वीकारले!
रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती!
“एक मिलियन डॉलर बिटकॉईन द्या, नाहीतर टर्मिनल २ उडवणार” मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल
सचिन वाझेला तुरुंगात हवेय मांजराचे पिल्लू
बॉडी बॅग घोटळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मागील महिन्यात महापालिका उपायुक्त रमाकांत बिरादार यांची चौकशी केली होती. बिरादार करोना काळात खरेदी विभागाचे प्रमुख होते. महापालिकेत कोविड काळात कथीत चार मोठे घोटाळे झाल्याचे आरोप असून त्यांपैकी बॉडी बॅग घोटाळा एक आहे.