हल्दवानी घटनेनंतर ५००० जणांविरुद्ध गुन्हा

पोलिसांकडून अटकेची कारवाई सुरू

हल्दवानी घटनेनंतर ५००० जणांविरुद्ध गुन्हा

उत्तराखंडमधील हल्दवानी शहरातील बेकायदेशीर मदरसा आणि लगतची मशीद पाडल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. यावेळी हिंसाचारही उफाळून आला. संतप्त जमावाकडून दगडफेक आणि वाहने जाळण्यात आली आहेत. जाळपोळीच्या घटनेनंतर सर्वत्र एकच गोंधळ उडाला. वाढता हिंसाचार पाहता हिंसाचार घडवणाऱ्या लोकांना गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली. शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस दल आणि सीआरपीएफ तैनात करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

या घटनेनंतर पोलिसांकडून १९ ओळख पटलेल्या आणि ५००० अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय अटकेची कारवाईही सुरु करण्यात आली आहे. दरम्यान हल्दवानी हिंसाचारप्रकरणी प्रशासनाने मोठा खुलासा केला आहे. हल्दवानी येथील हिंसाचार हा सुनियोजित कट असल्याचे सांगण्यात आले आहे. नैनितालच्या डीएम वंदना सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

माहितीनुसार, गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी हल्दवानी शहरातील बनभूलपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मलिकच्या बागेतील बेकायदेशीर मदरसा आणि नमाजची जागा महापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. मदरसा पाडल्याच्या निषेधार्थ जमावाने बनभूलपुरा येथे दगडफेक सुरू केली.

हल्दवानीच्या मलिका बगिचा परिसरात मदरसा आणि लगतची मशीद होती. स्थानिक प्रशासनाने मदरसा आणि मशीद बेकायदेशीर घोषित करून ते पाडण्याचे आदेश दिले. गुरुवारी पोलीस दलासह प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. बुलडोझरचा वापर करून मदरसा पाडण्याची प्रक्रिया सुरू असताना तेथे जमलेल्या जमावाने खळबळ उडवून दिली. जमाव हिंसक झाला आणि दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली. पोलिसांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. जमावाने पोलिस स्टेशनच्या जवळ उभ्या केलेल्या वाहनांना आग लावली.

हे ही वाचा:

गोळीबार प्रकरणातील जखमी भाजपाचे माजी नगरसेवक महेंद्र मोरेंची प्राणज्योत मालवली

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणातल्या मॉरीसने म्हणून नेमला अंगरक्षक

काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांना मिळणार ९० हजार पगार!

उत्तराखंडनंतर बरेलीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती, जमावाकडून दगडफेक!

राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, “न्यायालयाच्या आदेशानंतर हे पथक बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी गेले होते. तेथे समाजकंटकांचा पोलिसांशी वाद झाला. जाळपोळ करणाऱ्या दंगलखोर आणि अतिक्रमण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.”

Exit mobile version