दुबईहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात सापडली काडतुसे

घटनेचा तपास सुरू

दुबईहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात सापडली काडतुसे

दुबईहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमान क्रमांक AI 916 मध्ये काडतुसे आणि गनपावडर आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. विमानात एका सीटखाली काडतुसे आणि गनपावडर सापडल्याचे सांगण्यात येत आहे. क्रू मेंबरला विमानात काडतुसे आणि गनपावडर दिसताच त्याने तत्काळ इतर अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या विमानांना बॉम्ब टाकण्याच्या धमक्या दिल्या जात असताना ही घटना समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एअर इंडियानेही एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, विमानात काडतुसे आणि गनपावडर असल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप खाली उतरवण्यात आले. या घटनेत कोणाचेही नुकसान झाले नाही. या घटनेची एअर इंडियाने तातडीने विमानतळ पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची आता वरिष्ठ अधिकारी चौकशी करत आहेत.

हे ही वाचा:

जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा

‘इम्पोर्टेड माल’ विधानावरून अरविंद सावंतांनी मागितली माफी

‘इम्पोर्टेड माल’ विधानावरून संजय राऊतांकडून अरविंद सावंतांची पाठराखण

अहिल्यानगर पुणे महामार्गावरून २३ कोटी ७१ लाख रुपयांचे सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने जप्त

यापूर्वीही अनेक विमानांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. यामुळे अनेक विमान कंपन्यांना नुकसान सोसावे लागले होते. तर, प्रवाशांचा सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित झाला होता. केंद्र सरकारनेही या प्रकरणांची दखल घेतली असून या संबंधी कठोर उपाय योजना करण्याचे विचार सुरू आहेत.

Exit mobile version