काळजी घेणाऱ्या इसमामुळेच ते कुटुंबीय पडले काळजीत; काय घडले?

काळजी घेणाऱ्या इसमामुळेच ते कुटुंबीय पडले काळजीत; काय घडले?

घरकामाचा जबाबदारी असलेल्या इसमानेच दगा दिल्याची घटना माटुंग्यात घडली. सदर इसम आता पसार झालेला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

माटुंग्यामध्ये लाखोंचा गंडा घातल्याचे वृत्त नुकतेच समोर आलेले आहे. माटुंगा येथील व्यावसायिकाच्या घरात ही घटना घडलेली आहे. तब्बल १८ लाखांचा ऐवज लंपास करून विष्णू नामराज साही पसार झालेला आहे.

माटुंगा येथे राहणारे व्यावसायिक हेमंत ठोसानी यांनी आता यासंदर्भात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. सध्या पोलिस या केअर टेकरचा शोध घेत आहेत. ठोसानी यांची केमिकलची कंपनी आहे. वृद्ध वडिलांना चालता येत नसल्याने त्यांची काळजी घेण्यासाठी काळजीवाहक म्हणजेच केअरटेकर त्यांनी घरी ठेवला. परंतु याच केअर टेकरने घरातील ऐवज लंपास केल्याचे आता समोर आलेले आहे. वडिलांच्या सेवेसाठी ठेवलेल्या विष्णूने घरातच डल्ला मारला. गेल्यावर्षीपासून विष्णू ठोसानी यांच्याकडे केअर टेकर म्हणून कामाला होता.

ठोसानी हे सणाच्या निमित्ताने घराबाहेर असताना विष्णुने संधी साधत ऐवज लुटला. सणानिमित्ताने ठोसानी बाहेर गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी घराबाहेर गेले. त्याचवेळी काही कामानिमित्त त्यांच्या पत्नीने विष्णूशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु विष्णूचा फोन काही केल्या लागला नाही. विष्णूचा फोनच बंद होता. तसेच सासरेही फोन उचलेनात त्यामुळे संशय अधिक बळावला.

हे ही वाचा:

अनिल परब यांच्याविरुद्ध निलंबित अधिकारीच न्यायालयात

काय आहे अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेली ‘बॅड बॅंक्स’

धक्कादायक! महिला अत्याचारांमध्ये मुंबईचा क्रमांक दुसरा

दोषी अधिकाऱ्यांना केवळ दीड हजाराचा दंड! मग वचक बसणार कसा?

शेवटी त्यांनी अखेर शेजारच्या महिलेला घरी जाऊन चौकशी करण्यास सांगितले. शेजारची महिला घरी गेली. तिने घरी ठोसानी यांचे वडिल बेडरूममध्ये झोपलेले पाहिले. त्याचबरोबर घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त झाल्याचेही निदर्शनास आले. संबंधित महिलेने ठोसानी यांच्या पत्नीला घडलेली घटना सांगितली. ठोसानी व त्यांची पत्नी लगोलग घरी निघून आले. चोरीची घटना घडल्याचे त्यांना समजले होते. त्यानंतर त्यांनी लगेच गुन्हा दाखल केला. विष्णूने घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह हिरे दागिने सुद्धा लंपास केले आहेत.

Exit mobile version