24 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरक्राईमनामानवरात्रीच्या मिरवणुकीवर गाडी घातल्याचा भयानक व्हिडिओ समोर

नवरात्रीच्या मिरवणुकीवर गाडी घातल्याचा भयानक व्हिडिओ समोर

Google News Follow

Related

छत्तीसगड जशपूरमध्ये शुक्रवारी एका वेगवान गाडीने नवरात्रीच्या मिरवणुकीला धडक दिली. यामध्ये आत्तापर्यंत एकाचा मृत्यू झाला आणि १७ जण जखमी झाले. पोलिसांनी सांगितले की जखमींपैकी दोन जणांवर उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगढच्या जशपूरमध्ये दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणूक काढली जात असताना मध्य प्रदेशकडे जाणारे वाहन अचानक पठलगाव येथे जमावाला धडकले. एएनआय वृत्तसंस्थेने पोलिस अधीक्षक (एसपी) विजय अग्रवाल यांच्या हवाल्याने सांगितले, “एकाचा मृत्यू झाला, दोन गंभीर जखमी झाले, तर १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत.”

या घटनेतील पोलीस कारवाईबाबत सविस्तर माहिती देताना एसपी यांनी सांगितले की, दोन पोलीस-पाथळगाव स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) यांना निलंबित करण्यात आले आहे.

एसयूव्हीमधील दोन प्रवाशांना, बबलू विश्वकर्मा आणि शिशुपाल साहू यांना अटक करण्यात आली आहे आणि पोलिसांनी सांगितले की त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०२ (खून) आणि ३०४ (निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवून आणणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.

हे ही वाचा:

पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

बालकल्याण मंत्री म्हणतात, महिलांनो झोपायच्या आधी थोडी दारू प्या!

‘उद्धवजींमध्ये राहुलजी स्पष्ट दिसतात’

राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी

विश्वकर्मा आणि साहू दोघेही मध्य प्रदेशातील सिंगरौलीचे रहिवासी आहेत. ते छत्तीसगडमधून जात होते आणि घटना घडली तेव्हा शेजारच्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करत होते. असे पोलिसांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा