25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाभरधाव गाडी पिंपळाला आदळली आणि दोघे मृत्युमखी

भरधाव गाडी पिंपळाला आदळली आणि दोघे मृत्युमखी

चालक आणि सोबतचा इसम हॉस्पिटलमध्ये मृत घोषित

Google News Follow

Related

गुरुवार १३ ऑक्टोबरला रात्री सव्वाबाराच्या सुमारास कांजूर गाव बस स्टॉप जवळ (ईस्टन एक्सप्रेस हायवे उत्तरवाहिनी )येथे लाल रंगाच्या इनोव्हा गाडीला (MH 02 AL 5185) झालेल्या अपघाताची दखल पोलिसांनी तातडीने घेतली. या गाडीचा पिंपळाच्या झाडावर धडकून अपघात झाला होता. नियंत्रण कक्ष, चेंबूर येथून कॉलद्वारे माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी मदतीसाठी विक्रोळी मोबाईल १ स्टाफ त्वरित जाऊन सदर ठिकाणी गाडीत बसलेल्या ९ इसमांपैकी ८ जणांना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने फोर्टिस रुग्णालय, भांडुप येथे तर एका इसमास वीर सावरकर हॉस्पिटल, मुलुंड पूर्व येथे उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले.

सदर जखमीपैकी चालक जुनेद सलीम कुरेशी वय २६ राहणारा कसाईवाडा कुर्ला आणि आणखी एक इसम साहिल कुरेशी वय १८ राहणारा कसाईवाडा कुर्ला हे मृत्युमुखी पडले. तसेच जखमी अयात आयान हाजीम कुरेशी वय १८ वर्ष, हा गंभीर जखमी असून सध्या फोर्टिस हॉस्पिटल भांडुप येथे उपचार घेत आहे. सदर अपघातातील इतर ६ इसम किरकोळ जखमी असून त्यांची प्रकृती ठीक आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे यांच्या गटाचं चिन्ह जाणार?

पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी हाणून पाडली

मोटारीतून प्रवास करणाऱ्यासाठी सिलबेल्ट सक्ती

कॅरोलिनामध्ये समोर येईल त्याला तो गोळ्या झाडत गेला!

 

सदर अपघातग्रस्त गाडीचा चालक याने भरधाव वेगाने गाडी चालवत असल्याने त्याचा ताबा सुटून अपघातास कारणीभूत झाल्याने सरकारी पक्षातर्फे सहा. फौजदार अनिल कदम यांची फिर्याद घेऊन गु. र. क्र 495/22 भा. द. वि. कलम- 304अ,279,337,338 सह कलम 184 मो. वा. कायदा 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा