पोलिसांवर हात उचलण्यापासून त्यांच्यावर गाडी घालण्याचे प्रकार आजकाल वाढू लागले आहेत. पुण्यात अशाच एका प्रकाराने खळबळ उडाली. त्यात पोलिसावर गाडी घातल्याप्रकरणी एका आरोपीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक नियमभंगाच्या थकित दंडाची ४०० रुपयांची रक्कम भरण्यास पोलीस हवालदार शेषराव जायभाय यांनी सांगितल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. एका कार चालकाने वाहतूक पोलीस हवालदाराच्या अंगावर गाडी घातली. त्यानंतर त्याला बोनेटवरुन ७०० ते ८०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक पुण्यात घडला आहे.
या प्रकरणी पुण्यातील मुंढवा पोलिसांनी कार चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. या कारचालकाचे नाव प्रशांत श्रीधर कांतावर (४३, हडपसर) असे आहे. याबाबत पोलीस हवालदार जायभाय यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रशांत कांतावर याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा:
‘टीके से बचेगा देश’…भारताचे वॅक्सीन अँथेम ऐकलेत का?
काँग्रेस नेता म्हणाला, इस्लामिक अजेंडा राबवला जातोय!
भारतातील बैठकीसाठी पाकिस्तानलाही दिले निमंत्रण
आर्यन खानने एनसीबी अधिकाऱ्यांना दिलं ‘हे’ वचन
ही घटना मुंढवा सिग्नल चौकात खराडी बायपास रोड आणि साईनाथ नगर आणि झेन्सॉर कंपनी फाटा खराडी बायपास रोड दरम्यान शुक्रवारी दुपारी सव्वाचार ते साडेचार वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जायभाय आणि त्यांचे सहकारी वाहनांवरील पूर्वीच्या ऑनलाईन दंडाची रकमेसंदर्भात कारवाई करत होते. त्यावेळी प्रशांत कांतावर हा कार घेऊन त्या चौकात आला. तेव्हा जायभाय यांनी त्याला पूर्वीचा ४०० रुपयांचा दंड भरण्यास सांगितले. तेव्हा त्याने गाडीचा हॉर्न वाजवत दंडाची रक्कम न भरता जायभाय यांच्या अंगावर जीवे मारण्याच्या हेतूने गाडी घातल्याचा आरोप आहे.