फॉरेन्सिक करणार तपासणी
मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने तवेरा कार जप्त केली असून या कारमध्येच मनसुखची हत्या करण्यात आल्याचा संशय एनआयएला आहे. ही कार पुणे फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. मुकेश अंबानी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या वाहनांची संख्या १२ झाली असून त्यात एका स्पोर्ट्स बाईकचा समावेश आहे.
हे ही वाचा:
चायबिस्कुट पत्रकार बना, नाहीतर तुम्ही ‘भक्त’
ओएनजीसी बार्ज: नौदलाचे शोध व बचावकार्य अजूनही सुरूच
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताला ४० देशांकडून मदत प्राप्त
ममतांनीच जिल्हाधिकाऱ्यांना बोलू दिलं नाही
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटालिया घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या हे दोन्ही प्रकणाचा तपास एनआयए करीत असून या दोन्ही प्रकरणात एनआयए आतापर्यंत बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेसह पोलीस अधिकारी सुनील माने, रियाजुद्दीन काझी सह ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
या दोन्ही प्रकरणात मोठ्या प्रमाणात खाजगी वाहनाचा वापर केला असल्याचे एनआयएने जप्त केलेल्या वाहनावरून समोर आले आहे. दरम्यान एनआयए या दोन्ही प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे हा असून त्याने या दोन्ही गुन्ह्यांसाठी अनेक कारचा वापर केला असल्याचे उघडकीस आले आहे.
एनआयएने गुरुवारी टोयोटा कंपनीची लाल रंगाची तवेरा कार ठाण्यातून जप्त केली आहे. या तवेरा कारमध्ये मनसुखला बसवून विनायक शिंदे आणि त्याच्या इतर सहकाऱ्यानी मनसुख हिरेन याची हत्या करून मृतदेह मुंब्रा खाडीत फेकून दिले होते, असा संशय एनआयएला असून ही कार तपासणीसाठी पुण्यातील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आली आहे. या कारमध्ये मिळालेले पुरावे मनसुखच्या डीएनएशी जुळतात का ते तपासले जाणार असल्याची माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली आहे.