27 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरक्राईमनामापूर्व द्रुतगती महामार्गावर मोटार झाडावर आदळली, दोन ठार

पूर्व द्रुतगती महामार्गावर मोटार झाडावर आदळली, दोन ठार

Google News Follow

Related

विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्गावर बुधवारी मध्यरात्री एका भीषण अपघात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या मोटारीवरील चालकाचे नियंत्रण सुटून मोटार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात मोटार चालकासह दोन जण ठार झाले आहे. सिद्धार्थ ढगे (२३ ) आणि रोहित निकम (२९, दोघेही रा. विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर) अशी मृतांची नावे आहेत.

हे ही वाचा:

पोलिओग्रस्त वृद्ध दाम्पत्याला ६० लाखांना फसवले, २ लाख परत मिळाले!

मुख्यमंत्र्यांनी केली उद्धव ठाकरेंची पोलखोल, कोर्टाची कॉपीच दाखविली !

अयोध्या बलात्कार प्रकरणातील आरोपी मोईद खानचे शॉपिंग कॉम्प्लेक्स ‘भुईसपाट’

विवाहित महिलेवर बलात्कार करणाऱ्या तृणमूल काँग्रेसचा कार्यकर्त्यावर गुन्हा

 

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. मृत सिद्धार्थ ढगे हा भरधाव वेगात आणि बेदरकारपणे मोटार चालवत होता, त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले, भरधाव वेगात असलेली मोटार झाडावर आदळल्यानंतर ती पलटी झाली, त्यात चालक सिद्धार्थ ढगे आणि त्याच्या शेजारी बसलेला त्याचा मित्र रोहित निकम हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत घटनास्थळ गाठले आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, या अपघातात मोटार पूर्ण पणे चक्काचूर झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

दुर्घटनाग्रस्त मोटार ही मृत रोहित निकम यांची होती,त्याने सलून भाड्याने घेतले होते, तर सिद्धार्थ ढगे हा विद्यार्थी होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा