27 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरक्राईमनामाड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करायला जातानाच झाला अपघात

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करायला जातानाच झाला अपघात

वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी झाडावर आदळून अपघात घडला

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मार्गावरून जात असलेली गाडी एका झाडावर आदळल्याने चार मित्रांचा मृत्यू झाला, तर दुसरा जबर जखमी झाल्याची घटना घडली. ते बलदेव शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जात होते. त्यांच्यापैकी तिघांना ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करायचा होता.

रस्त्यावर खड्डा दिसल्याने दुचाकीस्वाराने अचानक मार्ग बदलल्याने ही घटना घडली. दुचाकीस्वाराला धडक बसू नये म्हणून वाहनचालकाने गाडी वळविली पण गाडीचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ते झाडावर जाऊन आदळले, अशी माहिती पोलिसांनी दिली. हे सर्व बलदेव शहरातील रहिवासी होते.

अंकित कुमार (२२), अचल सिंग (२३), आकाश कुमार (२१) आणि योगेश कुमार (२५) अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, जबर जखमी शैलेंद्र कुमार (२४) यांना आग्रा येथील उच्च वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी अपघातातील पाच जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे डॉक्टरांनी चौघांना मृत घोषित केले. तर, जखमी तरुणावर सध्या उपचार सुरू आहेत.

या प्रकरणाची चौकशी सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघातामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.

हे ही वाचा:

राज्याच्या बारावीच्या निकालात कोकण सरस, मुंबईने गाठला तळ, मुलींनी मारली बाजी

किरकोळ शरीरयष्टीचा चोर गज वाकवून कोठडीतून पळाला!

वीजचोरी पकडणाऱ्या महावितरणच्या भरारी पथकावर हल्ला

संसद भवनाला विरोध करणारे उद्घाटनाच्या गोष्टी करताहेत!

वाहन दरीत कोसळल्याने सात कामगारांचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यात बुधवारी ३०० फूट खोल दरीत वाहन कोसळल्याने पाकल दुल जलविद्युत प्रकल्पावर काम करणाऱ्या सात कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाल्याची घटना घडली. कामगारांची पाळी बदलल्यानंतर १० कामगारांना घेऊन ही गाडी जात होती. मात्र डाछन भागातील डांगदुरू वीज प्रकल्पाच्या ठिकाणी हा अपघात झाला. सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एका गंभीर जखमी कामगाराला बाहेर काढले जात असतानाच त्याने जीव सोडला. या अपघातात जखमी झालेल्या उर्वरित तीन कामगारांना पुढील उपचारासाठी किश्तवाड जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृत कामगारांपैकी इटवा आणि राहुल हे दोघे झारखंडचे तर इतर जम्मू काश्मीरचे आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा