30 C
Mumbai
Saturday, October 26, 2024
घरक्राईमनामानिज्जरची हत्या पाकिस्तानकडून?

निज्जरची हत्या पाकिस्तानकडून?

भारतीय गुप्तचर संस्थांच्या सूत्रांचा दावा

Google News Follow

Related

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी आणि कॅनडाचा नागरिक हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारत सरकारच्या एजंटचा सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. भारताने हे आरोप फेटाळून लावत कॅनडावर टीकाही केली आहे. मात्र आता या हत्येबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे. निज्जरची हत्या पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने घडवून आणली असल्याचा दावा भारतीय गुप्तचर संस्थेच्या सूत्रांनी केला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निज्जरची हत्या अमली पदार्थांच्या व्यापारावरील नियंत्रणावरून झाली आहे. कॅनडामध्ये राहणारे आयएसआयचे एजंट राहत राव आणि तारिक आयानी यांनी निज्जरची हत्या घडवल्याचा दावा या सूत्रांनी केला आहे. या दोन्ही एजंटची नावे एजंट भारताच्या ‘मोस्ट वॉँटेड’ यादीमध्ये समाविष्ट आहेत.कोणत्याही अनोळखी व्यक्तीला निज्जरच्या निकट पोहोचणे अशक्य होते. मात्र हे दोन एजंट निज्जरला भेटत होते. त्यामुळेच जिथे निज्जरचा कोणी निकटचा सहकारीही जाऊ शकत नाही, तिथे निज्जरची हत्या झाली.

हे ही वाचा

‘बारामती ऍग्रो’ प्लांट ७२ तासांत बंद करण्याच्या रोहित पवारांना सूचना

विमानतळांची कामे मार्गी लावण्यासाठी खासगी कंपनीकडील पाच विमानतळांचा ताबा ‘एमआयडीसी’ने घ्यावा

सन २०२४ आणि २०२९मध्ये ‘एक देश, एक निवडणूक’वर उमटू शकते मोहोर!

नगरसेवकांचा सहानुभूतीवर भरोसा नाय काय?

निज्जर हा आयएसआयच्या पाठिंब्याच्या जोरावरच खलिस्तानी अजेंडा राबवत होता. आयएसआयच्या मदतीने खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर पंजाबमध्ये अमली पदार्थांची तस्करी करत आहेत. यातील कमाईचा हिस्सा दहशतवादी आणि आयएसआयलाही मिळतो. या अवैध तस्करीवरील आयएसआयची पकड सैल झाल्यामुळे दहशतवादी याचा वापर मनमानीपणे करत आहेत. त्यामुळेच त्यांना निज्जरचा काटा काढावा लागला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

खलिस्तानसंदर्भात मोठी बैठक
खलिस्तानच्या मागणीसंदर्भात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये मोठी बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत १४ देशांमधील खलिस्तानी दहशतवादी सहभागी झाले होते. त्यात त्यांनी त्यांच्या खलिस्तानी मोहिमेला बळ देण्यासाठी तिचा विस्तार ८७ देशांपर्यंत करण्याच्या व्यूहरचनेवर चर्चा झाली. खलिस्तानच्या बाजूने जनमत एकवटून भयंकर पावले उचलण्यावर वरिष्ठ खलिस्तानसमर्थक नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती भारताच्या गुप्तचर संस्थेच्या सूत्रांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
185,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा