30 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामाझारखंड: दोन शालेय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने केली ५० लाखांची फसवणूक!

झारखंड: दोन शालेय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने केली ५० लाखांची फसवणूक!

वीज मीटर अपग्रेडच्या नावाखाली करत होते फसवणूक

Google News Follow

Related

झारखंडच्या जामतारा येथील दोन मुलांनी ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याची बातमी समोर आली आहे.विशेष म्हणजे फसवणूक करणारी दोन्ही मुले ही इयत्ता ८वी आणि १०वी च्या वर्गात शिकणारी आहेत.धनबाद जिल्ह्यातील सायबर पोलिसांनी कारवाई करत या दोघांना अटक केली.हे दोघे मिळून तीन-चार वर्षांपासून मोबाईल कॉल आणि ऑनलाईन पद्धतीचा वापर करत लोकांना फसवत असत.पोलिसांनी त्यांच्याकडून सहा मोबाईल जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी वीज मीटर आणि पीएम रिलीफ फंड अपग्रेड करण्याच्या नावाखाली अनेक लोकांच्या खात्यातून पैसे उकळले आहे.ते लोकांना फोन करून वीज विभागाचा अधिकारी असल्याची बतावणी करून वीज मीटर अपग्रेड करण्याच्या नावाखाली मोबाईल ऍप्लिकेशनची लिंक पाठवून रजिस्टर करायला सांगायचे आणि नंतर बँक खात्यातून पैसे काढायचे. तसेच त्यांनी पीएम रिलीफ फंडाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली आहे, असे चौकशीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

कोटामधील १६ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला

राहुल गांधींच्या अडचणींत वाढ; आसामच्या सीआयडीने पाठवले समन्स!

संदेशखालीचे वार्तांकन करणाऱ्या टीव्ही पत्रकाराला अटक

महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली संदेशखालीतील पीडितांची भेट!

दरम्यान, जामतारा येथील सायबर क्राईमच्या जाळ्यात शालेय विद्यार्थ्याचा समावेश होण्याची ही पहिलीच घटना नाही. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांत किमान १०० शालेय विद्यार्थी सायबर गुन्ह्यात अडकले आहेत.या विद्यार्थ्यांचे वय १३-१४ते १६-१८ वर्षे इतके असल्याचे पोलिसांनी सांगितले.गेल्या वर्षी वेगवेगळ्या सायबर गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या अनेक शालेय विद्यार्थ्यांनी शाळेतील उपस्थिती दाखवून जामीन मिळविण्याचा प्रयत्नही केल्याचे पोलिसांनी सांगितले .

जामतारा येथील एका सरकारी शाळेत शिकणारे सुमारे ३२५ विद्यार्थी अशा सायबर गुन्ह्यात अडकतील अशी भीती शाळा प्रशासनाला होती.शाळेच्या वेळेत कोणीही सायबर गुन्हे करू नये याकरिता शालेय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची शाळेत तीन वेळा हजेरी घेण्याची योजना सुरु केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा