पोलीस हवालदारा कडून कॅब चालकाला फायबर काठीने बेदम मारहाण केल्याची घटना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबई ‘सीएसएमटी’ येथे घडली. या घटनेचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली आहे. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीसानी या व्हिडीओची दखल घेऊन संबंधित पोलीस हवालदार यांच्यावर कारवाई सुरू केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
माहरुफ अहमद खान (२२) असे पीडित कॅब चालका
चे नाव आहे. मरूद हा गोवंडी येथे राहणारा असून स्वातंत्र्य दिनाच्या पहाटे २ वाजता मरूद खान हा मुंबई सीएसएमटी येथे प्रवाशाची वाट थांबला होता.त्यावेळी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस जीप त्या ठिकाणी आली, जीप मध्ये चालक पोलीस हवालदार रुपेश रंधवे आणि ‘एमएसएफ’चा जवान होते.पोलीस हवालदार रंधवे हे पोलीस जीप मधून बाहेर पडले आणि त्यांनी कॅब चालकाला तेथून कॅब काढण्यासाठी सांगितले.
हे ही वाचा:
आम्ही हिंदूंचे रक्षण करू… बांगलादेशकडून पंतप्रधान मोदींना ग्वाही
मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंचा राऊतांना पाठिंबा असेल का?
वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांचे नवीन भूखंडावर पुनर्वसन
महिला बचतगटांच्या उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी
कॅब चालक माहरुफ याने प्रवाशाची वाट बघतोय लगेच निघतो असे सांगितले, यावरून कॅब चालक आणि पोलीस हवालदार यांच्यात शाब्दिक वाद झाला, यावादातून हवालदार रंधवे यांनी त्यांच्याजवळील फायबर काठीने कॅब चालकाच्या पाठी वर वळ उठेपर्यत मारहाण केली. कॅब चालकाच्या पाठीवर काठीचे मोठ्या प्रमाणात व्रण उमटले आहे.
या मारहाणीचा व्हिडीओ शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या व्हिडीओची दखल माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी घेतला आहे, पोलीस हवालदार रुपेश रंधवे यांच्यावर कायदेशीर कारवाई तसेच विभागीय कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सांगितले आहे.