सध्या जोरात चालू असलेल्या नक्षलविरोधी कारवाईचा एक भाग म्हणून पोलिसांनी केलेल्या एका ऑपरेशनमध्ये महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील पाच नक्षलवाद्यांना यमसदनी धाडण्यात पोलिसांना यश आले आहे. हे ऑपरेशन खोब्रामेंडा जंगली भागात करण्यात आले होते.
शनिवारी, २७ मार्च रोजी पोलिसांनी अशाच तऱ्हेचे एक ऑपरेशन हेटाळकसा भागात केले होते. गुप्तहेर खात्याकडून मोठ्या प्रमाणात नक्षलवादी त्यांच्याकडून साजरा केल्या जाणाऱ्या ‘नक्षल सप्ताहात’ भाग घ्यायला या भागात गोळा होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे सी-६० पोलिस कमांडोंनी ही कारवाई केली होती.
हे ही वाचा:
संजय राऊतांवर ट्वीट करून शरद पवारांना आवाहन करण्याची वेळ
मिठी नदीतील पुराव्यांवर काय बोलला सचिन वाझे?
इस्रोकडून हरित इंधन निर्मीतीचे प्रयत्न वेगात सुरू
या ऑपरेशन दरम्यान सुमारे ६०-७० नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्याला नंतर चोख प्रत्युत्तर देण्यात आले होते. सुमारे तासभर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाल्यानंतर नक्षलवादी त्या स्थानापासून पळून गेले.
या कारवाई नंतर पोलिसांनी काही रायफली आणि प्रेशर कुकर बाँब हस्तगत केले. हे प्रेशर कुकर बाँब सुरक्षा दलांविरूद्ध वापरण्याचा त्यांचा इरादा होता.
सी-६० हे पोलिस खात्याचे स्वतंत्र दल आहे. हे दल विशेषत्वाने नक्षलवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचा गडचिरोली हा भाग नक्षलवादी कारवायांसाठी कुप्रसिद्ध असलेला भाग आहे.