26 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरक्राईमनामागॅस शेगडी मेकॅनिकला ४ लाखाच्या अफिमसह अटक

गॅस शेगडी मेकॅनिकला ४ लाखाच्या अफिमसह अटक

Google News Follow

Related

महाराष्ट्रात एकीकडे लॉकडाऊनमुळे सगळे दैनंदिन व्यवहार ठप्प असतानाच मुंबई पोलीसांनी अफिम पुरवणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे. हा इसम गॅस शेगडी मेकॅनिकच्या वेशात वावरत असून त्याच्या अडून अफिम पुरवण्याचे काम करत होता.

भायखळा पोलिसांनी शुक्रवारी रात्री एका गॅस शेगडी आणि सिलेंडर दुरुस्त करणाऱ्याला अटक केली असून त्याच्याजवळून १ किलो अफिम हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. सोनाराम हरिराम विशनोई उर्फ सुनिल, (४६) असे अटक करण्यात आलेल्या मेकॅनिकचे नाव आहे. भायखळ्यातील संत सावता मार्ग या ठिकाणी राहणारा सोनाराम हा मूळचा राजस्थानचा असून मुंबईत तो मागील काही वर्षांपासून भाडेतत्वावर राहण्यास आहे. शुक्रवारी रात्री भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिग ऑपरेशन सुरु असताना सोनाराम हा बॅ. नाथ पै मार्ग, टॅंक बंदर रोड टी जंकशन, माझगाव या ठिकाणी संशयास्पदरित्या पोलिसांना आढळून आला.

हे ही वाचा:

कोविडविरोधात डीआरडीओचे ‘अस्त्र’

करार आणि करारी

शिवसेनेने भ्रष्टाचार शिरोमणी सोनियांची तळी उचलणे स्वाभाविकच

कोविड रूग्णालयात उपचार घ्यायला पॉझिटिव्ह रिपोर्ट बंधनकारक नाही

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याच्याजवळ असणारी बॅग तपासली असता त्यात १ किलो अफिम सापडले. भायखळा पोलिसांनी अमली पदार्थ सह सोनाराम याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. राजस्थान मधून हा अफिम आणण्यात आले आहे. तेथील एका ड्रग्स माफियाने सोनारामला पैशाचे अमिश दाखवून हे अफिम मुंबईत पोहचवण्यासाठी सांगितले होते. मात्र हे कोणाला आणि कुठे पोहचवायचे याची माहिती त्याला नंतर देण्यात येणार होती. ही सर्व माहिती सोनारामने पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक श्यामराव पाटील, पोलीस उपनिरिक्षक शशिकांत ढाणे, पोलीस हवालदार राजन बोरसे, संतोष गायकवाड, पोलीस शिपाई अनिरुद्ध सावंत, (एटीसी पथक) यांच्या पथकाने केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा