चेंबूर डायमंड गार्डन येथे मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांपैकी एकाने ५० वर्षीय व्यवसायिकावर गोळीबार केल्याची घटना बुधवारी रात्री ९:५० सुमारास घडली.या गोळीबारात जखमी झालेले व्यवसायिकांना तात्काळ झेन रुग्णालय येथे दाखल करण्यात आलेले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गोळीबाराच्या घटनेने पूर्व उपनगरात खळबळ उडाली असून चेंबूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सद्रुद्दीन खान (५०) असे गोळीबारात जखमी झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे.सद्रुद्दीन खान हे पारसिक हिल बेलापूर येथे राहणारे आहेत. बुधवारी रात्री खान हे आपल्या मोटारीने सायन पनवेल महामार्गाने पनवेलच्या दिशेने निघाले होते.
हे ही वाचा:
हा तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळातील महाघोटाळा?
‘चांद पर दाग होता है, लेकिन पीएम मोदी पर एक भी दाग नहीं’
चीनला आमंत्रण देणाऱ्या बांगलादेशचे नाक भारताने दाबले!
ममता बॅनर्जी म्हणतात, प. बंगालमध्ये वक्फ (दुरुस्ती) कायदा लागू करणार नाही
दरम्यान चेंबूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डायमंड गार्डन सिग्नल जवळ त्यांची मोटार थांबताच मोटारसायकल वरून आलेल्या दोन जणांपैकी मागे बसलेल्या एकाने रिव्हॉल्वर मधून खान यांच्या दिशेने अंधाधुद गोळीबार करून पळ काढला.
रस्त्यावर झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने एकच गोंधळ उडाला होता.
या घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी खान यांना तात्काळ चेंबूर येथील झेन रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.