27 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरक्राईमनामाग्रँटरोडच्या हॉटेलच्या खोलीत सापडला सुरतच्या व्यापाऱ्याचा मृतदेह,मृतदेहासोबत होती मुलगी

ग्रँटरोडच्या हॉटेलच्या खोलीत सापडला सुरतच्या व्यापाऱ्याचा मृतदेह,मृतदेहासोबत होती मुलगी

हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा दावा

Google News Follow

Related

ग्रँट रोडयेथील एका हॉटेलच्या खोलीत सुरत मधील ४२ वर्षीय व्यापाऱ्याचा मृतदेह आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या खोलीत व्यापाऱ्याचा मृतदेह आढळून आला त्याच खोलीत १४ वर्षे वयोगटातील मुलगी घाबरलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळली.

प्राथमिक तपासावरून मृत व्यापाऱ्याने मुलीला बळजबरीने मुंबईत आणले होते, पोलिसांच्या प्राथमिक तपासात व्यापाऱ्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. डी. बी .मार्ग पोलिसांनी पीडित मुलीच्या तक्रारीवरून मृत व्यापाऱ्याविरुद्ध पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा:

शिवसेना, धनुष्यबाण ही शिंदे, उद्धव यांची प्रॉपर्टी नाही!

दोस्त दोस्त ना रहा!?

हिजाबविरोधात इराणमध्ये विचित्र आंदोलन

‘राज ठाकरेंनी भेट नाकारली, आता निवडणूक लढवणार’

संजय कुमार रामजीभाई तिवारी (४२) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे.संजय तिवारी हा गुजरात राज्यातील सुरत येथे राहणारा असून संजय कुमार हा शनिवारी मुंबईतील ग्रांट रोड येथील एका हॉटेलवर आला होता, त्याच्यासोबत १४ वर्षांची मुलगी होती. संजय तिवारी याने हॉटेलमध्ये एक खोली घेतली होती, दिवसभरात संजय तिवारी याने घेतलेल्या खोलीतून कुठलीही हालचाल आढळून न आल्यामुळे हॉटेलच्या केअरटेकरने संशय आल्याने त्याने पोलिसांना कळवले.

डी. बी. मार्ग पोलिसांनी तात्काळ हॉटेलवर धाव घेऊन ड्युप्लिकेट चावीने खोली उघडली असता खोलीत एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेला होता व त्याच्यासोबत असलेली मुलगी एका कोपऱ्यात घाबरलेल्या अवस्थेत आढळून आली.
पोलिसांनी तात्काळ संजय तिवारी याला जेजे रुग्णालयात आणले असता डॉक्टरानी तपासून मृत घोषित केले.

पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान ,खोलीतील मुलीकडे चौकशी करण्यात आली असता ती काहीही बोलण्याच्या अवस्थेत नव्हती, पोलिसांनी तिच्या कुटूंबातील व्यक्तीचा मोबाईल क्रमांक मिळवुन मुलीच्या आईशी संपर्क साधला असता संजय तिवारी हा मुलीला बळजबरीने घेऊन गेला असे पीडित मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी मृत संजय तिवारी विरुद्ध पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिवारीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा अशी शक्यता आहे, तिवारी यांच्या शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नसून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे2 पोलिसांनी सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा