जम्मू काश्मीरमध्ये खासगी बस दरीत कोसळून १० प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. तर ५५ जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. या खसागी बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसले होते अशी माहितीही समोर येते आहे.
अशात या प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. जखमी प्रवाशांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. हे प्रवासी अमृतसरहून वैष्णो देवीच्या दर्शनाला चालले होते. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधीक्षक चंदन कोहली यांनी सांगितले की या अपघातात १० लोकांचा मृत्यू झाला आहे तर ५५ लोक जखमी झाले आहेत.
स्थानिकांच्या मदतीने या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. जे जखमी झाले आहेत त्या सगळ्यांना जम्मूच्या सरकारी मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी २१ मे २०२३ रोजी देखील जम्मूमध्ये बसचा अपघात झाला होता. त्यावेळी एका महिलेचा मृत्यू आणि २४ जण जखमी झाले होते.
जे मृतदेह सापडले आहेत ते शवगृहात पाठविण्यात आले असून क्रेनच्या सहाय्याने बसखाली आणखी कुणी अडकले आहे का, याचीही पाहणी करण्यात येत आहे. आम्हाला अशी माहिती मिळाली की, ही बस अमृतसरहून येत होती. त्यात बिहारचे लोक होते. कतराकडे जात असताना हा अपघात घडला. कतराकडे माता वैष्णोदेवीकडे बस रवाना होत होती. या बसमध्ये प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी होते, असा प्रारंभिक कयास असल्याचे कोहली यांनी सांगितले.
हे ही वाचा:
धानोरकर यांच्या निधनाने उमदे, लढवय्ये नेतृत्व गमावले!
‘द केरळ स्टोरी’ सुसाट; ३०० कोटींच्या क्लबकडे घोडदौड
शेवटचे तीन चेंडू धोनीने पाहिलेच नाहीत; पण जिंकल्यावर जाडेजाला उचलून घेतले
समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांना युगांडात मृत्युदंडाची शिक्षा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अपघातग्रस्तांबद्दल संवेदना व्यक्त केल्या. मृतांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली तर जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
जम्मू में हुई बस दुर्घटना में कई तीर्थयात्रियों की मृत्यु अत्यंत दुर्भाग्यपूर्ण है। अपने प्रियजनों को खोने वाले परिवारों के प्रति मेरी गहरी शोक-संवेदनाएं। मैं घायल हुए लोगों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करती हूं।
— President of India (@rashtrapatibhvn) May 30, 2023