मुंबई पुणे जुन्या मार्गावर बस दरीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू, गोरेगावचे झांज पथकही होते

बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे हा अपघात घडला.

मुंबई पुणे जुन्या मार्गावर बस दरीत कोसळली, १३ जणांचा मृत्यू, गोरेगावचे झांज पथकही होते

जुन्या मुंबई पुणे मार्गावरील दरीत कोसळून एका खासगी बसच्या अपघातात १३ लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. यात गोरेगावचे एक झांज पथकही असल्यामुळे त्यांचे काय झाले याविषयी भीती व्यक्त होत आहे.

या बसमधील १६-१७ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी हा अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर लागलीच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले. बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे हा अपघात घडला. पहाटे ४ च्या सुमारास ही घटना घडली.

ही बस पुण्याहून मुंबईकडे निघाली होती. पहाटेच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने बस दरीत कोसळली. बस खाली गेल्यानंतर लोकांचा आरडाओरडा सुरू झाला. प्रवासी गाढ झोपेत होते तेव्हाच हा अपघात झाला.

पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याने अंधारात मदतकार्य करणे कठीण बनले. पण प्रवाशांना वाचविण्यासाठी ग्रामस्थांनी मदत केली. त्यानंतर अग्निशमन दलाला ही माहिती देण्यात आल्यानंतर त्यांच्या गाड्या, हायकर्स ग्रुप, स्थानिक ग्रामस्थ अशा सगळ्यांनी मदतकार्य सुरू केले.बसमध्ये ४०-४५ लोक होते. त्यातील २०-२५ लोक जखमी झाले आहेत. १६ प्रवासी सुखरूप आहेत असे कळते.

हे ही वाचा:

सावरकरांबद्दल काँग्रेसकडून पुन्हा अभद्र टिप्पणी, उद्धव ठाकरे काय करणार?

मागून आलेल्या बसने धडक दिल्याने पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू

उधमपूरमध्ये पूल कोसळून ८० पेक्षा जास्त जखमी

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयचे बोलावणे

या बसमध्ये मुंबईच्या गोरेगाव येथील बाजीप्रभू वादक पथक होते. झांजपथक पुण्यातील कार्यक्रम आटोपून मुंबईकडे निघाले होते. रायगडचे पोलिस अधिकारी सोमनाथ घार्गे यांनी ही माहिती दिली. जखमींना खोपोली येथील नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version