आसाममधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी तफाझुल इस्लाम याने शनिवार, २४ ऑगस्ट रोजी पोलिसांच्या ताब्यातून पळ काढण्याचा प्रयत्न करत तलावात उडी मारली. यानंतर तलावात उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलीस आरोपीला गुन्हा घडल्या त्या ठिकाणी शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास नेत असताना त्याने पोलिसांच्या तावडीतून सुटून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि नागाव येथील तलावात उडी मारली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
आसाममधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा मुख्य आरोपी तफाजुल इस्लाम याने शनिवारी सकाळी पोलिसांच्या ताब्यातून पळ काढला आणि नागाव जिल्ह्यातील धिंग येथील तलावात उडी मारली यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपीचे वडिलोपार्जित घर असलेल्या बोरभेटी येथील ग्रामस्थांनी त्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित न राहण्याचा आणि त्याला गावात दफन करू न देण्याचा निर्णय घेतला आहे.
स्थानिक रहिवासी सकलेन म्हणाले की, “आम्ही या गुन्हेगाराच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार नाही, असा निर्णय घेतला आहे. आम्ही त्याच्या कुटुंबालाही समाजापासून वेगळे केले आहे. आम्ही गुन्हेगारांसोबत राहू शकत नाही.” तर, आणखी एक स्थानिक असदुद्दीन अहमद म्हणाले की, “आरोपीच्या कृतीमुळे आम्हाला लाज वाटली. जेव्हा आम्हाला कळले की गुन्हेगाराचा मृत्यू झाला आहे, तेव्हा आम्ही त्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार नाही, असे ठरवले आहे.”
पोलिस अधीक्षक (एसपी) स्वप्नील डेका यांनी सांगितले की, आरोपीने पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केला, पोलिसांच्या ताब्यातून पळ काढला आणि तलावात उडी मारली. ते म्हणाले की SDRF ला ताबडतोब माहिती देण्यात आली, शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि सुमारे दोन तासांनंतर त्याचा मृतदेह सापडला. पोलीस कर्मचारीही जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे एसपींनी सांगितले. अन्य दोन आरोपी अद्याप फरार असून शुक्रवारी रात्री अनेक ठिकाणी छापे टाकून त्यांचा शोध सुरू आहे.
हे ही वाचा..
पंजाबच्या अमृतसरमध्ये अनिवासी भारतीयावर गोळीबार
मुरादाबाद बलात्कार प्रकरण; आरोपी शाहनवाजच्या कुटुंबाचे ३ मदरसे सील !
पंतप्रधान मोदी, योगींचे कौतुक केल्यामुळे मुस्लीम महिलेला पतीकडून ‘तिहेरी तलाक’
नालासोपार्यात १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक
गुरूवारी संध्याकाळी एका १४ वर्षीय मुलीवर तीन जणांनी बलात्कार केला होता. त्यावेळी मुलगी ट्युशनचा अभ्यास करून घरी परतत होती. आरोपीने पीडितेला जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावाजवळ सोडून पळ काढला. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी सांगितले होते की दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.