32 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरक्राईमनामाखांद्यात लागलेली गोळी घेऊन ६०० किमी प्रवास, गुन्हा दाखल होऊ नये म्हणून...

खांद्यात लागलेली गोळी घेऊन ६०० किमी प्रवास, गुन्हा दाखल होऊ नये म्हणून धावपळ

तांत्रिक तपासावरून गोळीबारामागे काही वेगळेच प्रकरण असल्याचा पोलिसांना संशय आला

Google News Follow

Related

उजव्या खांद्यात घुसलेल्या पिस्तुलच्या गोळी सोबत त्याने गंभीर जखमी अवस्थेत असताना मित्रांसोबत कर्नाटक ते कल्याण असा ६०० किलोमीटर १३ तास प्रवास केला. खांद्याला झालेल्या जखमेच्या वेदना जाणवू नये म्हणून त्याचे दोन्ही मित्रांनी संपूर्ण प्रवासात त्याला दारूच्या नशेत ठेवले,अखेर १३ तासांच्या प्रवासा नंतर उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर मुबईतील केईएम रुग्णालयात शस्त्रक्रिया करून खांद्यात अडकलेली पिस्तुलची गोळी (काडतुस) काढण्यात आली. कर्नाटकात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून जखमी सुनीलला घेऊन मित्रांनी जीवघेणा प्रवास केला.

२२ जुलै रोजी सायंकाळी सेंट्रल हॉस्पिटल, उल्हासनगर येथील डॉक्टरांनी बदलापूर पोलिसांना माहिती दिली की पनवेल महामार्गाजवळील बदलापूर येथे एका २४ वर्षीय तरुणावर अज्ञात व्यक्तींनी गोळी झाडली आहे, त्याच्या उजव्या खांद्यावर गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलविण्यात आले. बदलापूर पोलिसांनी तातडीने रुग्णालयात जाऊन जखमीची भेट घेतली.

जखमी सुनील प्रजापती, उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या युवकाने पोलिसांना सांगितले की, “२१ जुलै रोजी संध्याकाळी मी बदलापूर (पू) येथील टेकडी भागात गेलो आणि एकटाच दारू प्यायला बसलो, त्या ठिकाणी रात्री १० च्या सुमारास दोघेही भांडू लागले, मी दोघांचे भांडण सोडवण्यासाठी गेलो असता त्यातील एकाने रिव्हॉल्व्हर काढून माझ्यावर गोळी झाडली, गोळी माझ्या उजव्या खांद्याला लागली.शेजारी बसलेल्या लोकांनी मला मदत करण्याचा प्रयत्न केला पण हल्लेखोराने त्यांनाही गोळ्या घालण्याची धमकी दिली. मी खाली पडलो आणि माझे भान हरपले,” अशी माहिती जखमी सुनीलने पोलिसांना दिली.

हे ही वाचा:

पुरोगामी कुबेरगिरी कोरड्या ओकाऱ्या

पुण्यात गेल्या ७ महिन्यात ६५ सराईत गुन्हेगार हद्दपार

चमत्कार!! अंगावर वीज पडल्याने कोमात गेलेली विद्यार्थीनी होतेय पूर्ववत

पाकिस्तानच्या विद्यापीठात अंमली पदार्थ, लैंगिक शोषण आणि अश्लिल व्हीडिओ

“मी २२ रोजी दुपारी २ च्या सुमारास शुद्धीवर आलो आणि कसा तरी उल्हासनगरला आलो. दरम्यान कोणीतरी माझा भाऊ अनिलला कळवले आणि त्याने माझे मित्र आदित्य जैस्वाल आणि नीलेश यादव यांना घेऊन मला हॉस्पिटलमध्ये नेले आणि सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असा जबाब सुनीलने पोलिसांना दिला. त्याच्या जबानीच्या आधारे एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

हा गंभीर गुन्हा असल्याने पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पडवळ यांना हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी पथके तयार करण्याचे आदेश दिले. “जखमी व्यक्ती इस्पितळात असल्याने आणि पुढे उपचारासाठी केईएम रुग्णालयात हलवण्यात आले असल्याने, आम्हाला घटनास्थळ दाखवण्यासाठी कोणीही नव्हते. त्यामुळे गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी ३ वेगवेगळी पथके तयार करण्यात आली,” एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

तपासादरम्यान असे आढळून आले की, घटने बाबत सुनील तसेच त्याचा भाऊ आणि त्याच्या मित्रांच्या वक्तव्यात काही विसंगती आढळून आली, दरम्यानच्या काळात तपास अधिकारी यांनी केलेल्या तांत्रिक तपासावरून गोळीबारामागे काही वेगळेच प्रकरण असल्याचा पोलिसांना संशय आला, घटनेच्या ठिकाणाजवळील सीसीटीव्ही फुटेज आणि अनेक लोकांच्या चौकशीतून स्पष्ट झाले की सुनील प्रजापतीने सांगितलेल्या ठिकाणी गोळीबार झाला नाही.

शेवटी पोलीस एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार जहिर नजीर अन्सारी हा मिळून आला त्याच्याकडे पोलीस पथकाने चौकशी केली असता त्याने कबूल केले की, तो, प्रजापती आणि त्याचे मित्र रेहान खान आणि राम आशिष पटेल घटनेच्या दिवशी बदलापूरमध्ये नव्हते तर ते तेलंगणातील नारायण पेठेत गेले होते. २१ जुलै रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारास डोंगराळ भागात मद्यपान करत असताना राम आशिष हा पिस्तूल हाताळत असताना चुकून गोळी सुटली आणि प्रजापतीच्या उजव्या खांद्यात घुसली.तेलंगनामध्ये पोलिस केसच्या भीतीने चौघांनी पुन्हा उल्हासनगरला येण्याचा निर्णय घेतला.

“त्यांनी त्याच दिवशी ते ठिकाण सोडले आणि त्याच रात्री मुंबईच्या दिशेने ट्रेन पकडली आणि जखमी सुनीलला घेऊन २२ जुलै रोजी दुपारी कल्याणला पोहोचले आणि त्यांनी ताबडतोब त्याचा भाऊ अनिल याला माहिती दिली आणि प्रवास करताना त्यांनी तयार केलेली खोटी घटना सांगितली,” बदलापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पडवळ यांनी सांगितले. “कळव्याच्या रुग्णालयात असताना तेथील पोलिसांनी रक्ताने भिजलेला शर्ट जपून ठेवण्यास सांगितल्या नंतरही त्यांनी प्रवासा दरम्यान रक्ताने भिजलेला शर्ट नष्ट केला आणि पँटही बदलली,” अशी माहिती जहीर याने पोलिसांना दिली.   पोलिसांनी रेहान खान (३६ ) आणि राम आशिष पटेल (३२) यांना २६ जुलै रोजी अटक केली. पोलिसांनी दोघांकडून ३ पिस्तूल, ६ रिकामी मॅगझिन आणि २१ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्या आहेत. सुनील प्रजापती याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर उल्हासनगर येथे गुन्हे दाखल आहेत. ७ महिन्यांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा