पुण्यात ड्रग्‍ज विकणाऱ्या पबवर बुलडोजर फिरवणार; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईला वेग

पुण्यात ड्रग्‍ज विकणाऱ्या पबवर बुलडोजर फिरवणार; मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. पुण्यातील ड्रग्‍ज प्रकरण समोर आल्‍यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ॲक्‍शन मोडवर आले आहेत. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून शहरातील अनधिकृत पबवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे. पुण्यात ड्रग्‍ज विकणाऱ्या पबवर बुलडोजर चालवण्याचे आदेश आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना त्‍यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, “पुण्याला अमलीपदार्थ मुक्त शहर बनविण्यासाठी अनधिकृत पबवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमली पदार्थाशी निगडित असलेल्या पबवरील अनधिकृत बांधकाम बुलडोझरने पाडावे, असे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना देण्यात आले आहेत.”

हे ही वाचा:

गँगस्टर विकास दुबेची मालमत्ता जप्त होणार

दक्षिण दिल्लीत गायीचे शव सापडल्यानंतर धमक्या, द्वेषयुक्त भाषणे

कर्नाटकमध्ये चिकन कबाब, माशांच्या पदार्थांत कृत्रिम रंग वापरण्यास बंदी!

‘बंगाल सरकारने खोटे वृत्त पसरवले’

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्वीड, लिजर, लाऊंज (एल थ्री) पबमधील प्रसाधनगृहात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, मध्यरात्रीनंतर पब सुरू असल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. पबमालकासह, चालक, व्यवस्थापकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने, तसेच सहायक निरीक्षक दिनेश पाटील यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

Exit mobile version