पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल ठोकरच्या घरावर चालवला बुलडोझर

२०१८ मध्ये पाकिस्तानमध्ये जाऊन घेतले होते दहशतवादी प्रशिक्षण

पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल ठोकरच्या घरावर चालवला बुलडोझर

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन व्हॅली पर्यटन स्थळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून या हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधण्याचे काम सुरूचं आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना आणि हल्ल्याच्या सूत्रधारांना सोडणार नाही, कठोर कारवाई होणार, असा इशारा देण्यात आला आहे. अशातच आता हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन स्थानिक दहशतवाद्यांवर प्रशासनाने कडक कारवाई केली आहे.

आदिल हुसेन ठोकर, रहिवासी बिजबेहरा, अनंतनाग आणि आसिफ शेख, रहिवासी त्राल या दोघांच्या घरावर कारवाई करण्यात आली आहे. सुरक्षा दलांनी बिजबेहराच्या गोरी भागात आदिल ठोकर उर्फ आदिल गुरीच्या घरावर बुलडोझर चालवल्याचे समोर आले आहे. त्याचे घर जमीनदोस्त करण्यात आले आहे. तर, दुसरा दहशतवादी आसिफ शेख याच्या घरात स्फोट झाल्याची माहिती आहे. माहितीनुसार, चार दहशतवाद्यांच्या गटाने २२ एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हल्ला केला. या हल्ल्यात विशेषतः हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले आणि त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात २६ लोक मृत्युमुखी पडले, त्यापैकी बहुतेक पर्यटक भारतातील विविध राज्यांमधून काश्मीरमध्ये आले होते.

हे ही वाचा:

पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेल्या अतुल मोनेंच्या पत्नीला मध्य रेल्वेत नोकरी

“भोंगा मुक्त मुलुंड”, मशिदींवरील अनधिकृत भोंगे पोलिसांनी उतरवले!

पाकिस्तानचा शेअर बाजार अडीच हजारांनी पडला!

सिंधू जल कराराचे स्थगन योग्य दिशेने उचललेले पाऊल

चार दहशतवाद्यांपैकी दोघे स्थानिक दहशतवादी होते, तर इतर दोघे पाकिस्तानी दहशतवादी होते, अशी माहिती आहे. आदिल ठोकरने या हल्ल्याचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केली होती, असा आरोप आहे. आदिल ठोकरचे पाकिस्तान कनेक्शन सुरक्षा यंत्रणांनी उघड केले आहे. बिजबेहरा येथील रहिवासी आदिल हुसेन ठोकर उर्फ आदिल गुरी हा २०१८ मध्ये उर्दूमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर वैध कागदपत्रांसह अटारी- वाघा सीमेवरून पाकिस्तानला गेला होता. तिथे त्याने दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांमध्ये भाग घेतला आणि शस्त्रे हाताळण्याचे आणि स्फोटके बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. २०२४ मध्ये तो जम्मू आणि काश्मीरमध्ये परतला आणि दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय झाला.

पाकसोबत गंगाजमनी तहजीबवाल्यांचा इलाज करा... | Dinesh Kanji | Robert Vadra | Pahalgam Attack |

Exit mobile version