मुंबईच्या पश्चिम उपनगरात वांद्रे पूर्व येथे बेहराम नगर परिसरात पाच मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेकजण दबले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अधिकृत माहितीनुसार सातजण जखमी आहेत. घटनास्थळी पोलीस, अग्नीशमन दलाचे पथक आणि रुग्णवाहिका दाखल झाले आहेत. मदतकार्य सुरू आहे. एका आठवड्याच्या आत मुंबईत तिसरी मोठी दुर्घटना घडली आहे. यामुळे मुंबईतील इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आहे.
#WATCH | Visuals from the site of 5-storey building collapse in Behram Nagar locality of Bandra (East), Mumbai.
Five people are feared trapped in the building, as per BMC pic.twitter.com/J5MXuAmIdn
— ANI (@ANI) January 26, 2022
या इमारतीचा भाग कोसळून ढिगाऱ्याखाली ५ ते ६ लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमनदलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि ६ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही घटना वांद्रे येथील बेहरामपाडा येथील प्राध्यापक अनंत काणेकर मार्गावर, रझा मशिदीजवळ घडली आहे.
हे ही वाचा:
राजपथावर संचलन पाहायला होते ‘हे’ खास पाहुणे
भारतीय महिला हॉकी संघाला उघडले वर्ल्डकपचे दरवाजे
युवराजच्या घरी आला आणखी एक ‘युवराज’
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ६ जणांची सुटका करण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून या ६ पैकी २ पुरुष आणि २ महिलांना व्ही. एन. देसाई रुग्णालय आणि १ पुरुष आणि एका महिलेला वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे बचावकार्य अजूनही सुरू आहे.
कालच्याच दिवशी मालाड येथे तीन मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली होती., मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. काही दिवसांपूर्वी ताडदेव मधील कमला इमारतीला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला होता तर २३ जण जखमी झाले होते.