भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका हद्दीतील अब्दुल बारी मोमीन ही दुमजली इमारत शनिवारी मध्यरात्री कोसळली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील एका महिलेसह आठ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जुन्या इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
भिवंडी शहरातील साहिल हॉटेलजवळ मूर्तीजा कंपाउंड गौरीपाडा येथे मध्यरात्री १२.३० ते १२.४५ दरम्यान इमारत कोसळली. यात उजमा अब्दुल लतीफ मोमीन (महिला, ४०) आणि तस्निम कौसर मोमीन मुलगी (आठ महिने) या दोघींचा मृत्यू झाला. तर अब्दुल लतीफ मोमीन (पुरुष, ६५), फरजाना अब्दुल लतीफ मोमीन (महिला, ५०), बुरारा अतिफ मोमीन (महिला, ३२) आणि आदिमा अतीफ मोमीन (मुलगी, ७ वर्षे) हे चौघे जखमी झाले आहेत. जखमींना अल मोईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा:
झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू हिथ स्ट्रीकचे निधन
लैंगिक अत्याचार करत ब्लॅकमेल करणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्याने केले ठार
चीनचे अध्यक्ष जिनपिंग जी-२० परिषदेला अनुपस्थित राहणार, मग कोण येणार?
एक देश एक निवडणूक; समितीमधील सहभागास अधीर रंजन चौधरी यांचा नकार !
अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. अग्निशमन विभागाचे अधिकारी राजेश पवार यांनी सांगितले की, इमारतीत एकूण सहा जण अडकले होते. त्यातील चार जणांना वाचवण्यात यश आले. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
सदर इमारतीला सुमारे ४० ते ५० वर्षे जुनी होती आणि ती राहण्यायोग्य नव्हती. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर यंत्रमाग कारखाना देखील होता. दरम्यान, ही इमारत धोकादायक असल्याच्या नोटिसा देखील पालिकेने बजावल्या होत्या.