पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने थेट शासनाची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्यावसायिकांनी म्हाडाला बनावट कागदपत्रे दिल्याचे उघड झाले आहे. तसेच म्हाडासह आणखी ५६ सदनिका धारकांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी म्हाडाने दोन्ही व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बांधकाम व्यावसायिक अग्रिम गोयल आणि आर्किटेक्ट प्रमोद देशपांडे यांनी पुणे म्हाडा येथे बनावट कागदपत्रे सादर केली. बांधकाम व्यवसायिक अग्रिम गोयल यांनी धानोरी येथील सर्व्हे क्रमांक २४/१/२/3/४/५/१० आणि सर्वे क्रमांक ६७/१ बी/१० या मिळकतीवर ईडब्लूएस व एलआयजी धारकांसाठी ५६ सदनिकांची स्वतंत्र योजना उभारली. गोयल यांनी स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत, म्हाडासाठी योजना राबवत असताना बांधकामाच्या बदल्यात अधिकचा एफएसआयचा फायदा घेतला. यासाठी त्यांनी म्हाडाच्या कार्यालयात खोटे प्रतिज्ञापत्र, हमीपत्र देत म्हाडासह ५६ सदनिका धारकांची फसवणूक केली.
हे ही वाचा:
‘घोटाळा केला असेल तर तुम्हीच सरकारी पाहुणे व्हाल’
‘पर्यावरण मंत्र्यांची समुद्र किनाऱ्यासाठी काम करण्याची इच्छा दिसत नाही’
बिपिन रावत यांच्या निधनावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर होणार कारवाई
तमिळ दिगदर्शक अली अकबर का सोडत आहेत इस्लाम?
शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आर्किटेक्ट प्रमोद देशपांडे याने खोटे आणि रचनात्मक इमारतीचे आराखडे तयार केले. हे खोटे आराखडे म्हाडाकडे सादर करत ते मंजूर करून घेतले. म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी ही माहिती दिली असून ‘टीव्ही ९’ने दिलेल्या वृत्तानुसार याबाबत पुणे गृह निर्माण वक्षेत्रविकास महामंडळाच्या मुख्य उपअभियंता आशा हेमंत भोसले यांनी अग्रिम गोयल आणि प्रमोद देशपांडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.