सीबीआयने केला दावा
१०० कोटींच्या वसुलीप्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लिन चीट देणारा सीबीआयचा अहवाल मध्यंतरी प्रसिद्ध झाला होता. तसा अहवाल तयार करण्यासाठी सीबीआयच्या अधिकाऱ्याला लाच देण्यात आल्याचा खळबळजनक दावा सीबीआयने केला आहे. याच संदर्भात एका पोलिस अधिकाऱ्याला नागपूरहून अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू आहे.
सीबीआयच्या एका अधिकाऱ्याला लाच देण्यात आल्याच्या या प्रकरणात आता चौकशी सुरू झाली आहे. यासंदर्भात देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची चौकशी केल्यावर त्यांची यात काहीही भूमिका नाही, हे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले. पण वकील आनंद डागा यांची चौकशी सुरू आहे.
१५ दिवसांच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल बनवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या टीममधील एका अधिकाऱ्याला लाच देण्यात आली होती, असे समोर आले आहे. गेल्याच आठवड्यात अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लिन चीट दिल्याचे पत्र व्हायरल झाले होते. हे पत्र राहुल गांधी यांच्यासह मोदी विरोधकांना पाठविण्यात आल्याचेही समोर आले होते.
हे ही वाचा:
सीएनएनला भारत सरकारची कृतीतून चपराक
अनिल देशमुखांचा जावई सीबीआयच्या ताब्यात
एसटी कर्मचाऱ्यांना पगारही नाही, पगारवाढही नाही
‘बेस्ट’ने एसटीला ७१ कोटी दिले तर पगार तरी निघतील!
आता ज्या सीबीआय अधिकाऱ्याने ही लाच स्वीकारली त्याची ओळख पटली असून त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याच प्रकरणात ही लाच कोणी दिली, किती दिली हे तपासण्यासाठी सीबीआयची आजची चौकशी सुरू आहे. सदर क्लिन चीट दिल्याचे पत्र समोर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. पण नंतर इंडिया टुडेने अशी क्लिन चीट देण्यातच आली नसल्याचे वृत्त दिले. मुख्य म्हणजे ज्यांना या पत्राची प्रत पाठविण्यात आली त्यांच्याकडून या क्लिन चीटबाबत कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती.