26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामाफटाक्यांचे अमिष दाखवून ८ वर्षीय मुलावर लैगिंक अत्याचार

फटाक्यांचे अमिष दाखवून ८ वर्षीय मुलावर लैगिंक अत्याचार

वाच्यता केल्यास जीवे मारू अशी धमकी आरोपीने दिली होती

Google News Follow

Related

फटाके देण्याचे आमिष दाखवून ८ वर्षाच्या मुलावर लैगिंक अत्याचार केल्याची संतापजनक घटना मुंबईतील अँटोप हिल येथे  उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३२ वर्षीय इसमाला अटक केली असून यापूर्वी देखील त्याच्यावर या प्रकारच्या दोन घटना दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

८ वर्षाचा पीडित मुलगा हा सोमवारी सांयकाळी घराशेजारी फटाके वाजवत होता, यादरम्यान त्याच परिसरात राहणारा ३२ वर्षीय संशयित आरोपीने मुलाला जवळ बोलावले व त्याला आणखी फटाके देण्याचे अमिष दाखवले, व फटाके देतो असे सांगून जवळच असणाऱ्या एका इमारतीत पीडित मुलाला आणून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची कुठेही वाच्यात केल्यास जीवे मारू अशी धमकी आरोपीने पीडित मुलाला दिली.

हे ही वाचा:

न्यूजक्लिक प्रकरणी अमेरिकन उद्योजक नेव्हिल रॉय सिंघमला समन्स

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला औषधातून गिळायला लावले ब्लेडचे तुकडे!

रेल्वेच्या मोटरमनकडे बुलेट ट्रेनचे सारथ्य?

‘निज्जरच्या हत्येत सहभागाचे आरोप करण्यापूर्वी पुरावे द्या’!

घाबरलेल्या मुलाने हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. बुधवारी त्याला त्रास होऊ लागल्यामुळे तो एका कोपऱ्यात रडत असताना त्यांच्या वडिलांनी रडण्याचे कारण विचारले असता त्याने त्याच्या सोबत घडलेला प्रसंग वडिलांना सांगितला.
मुलासोबत झालेल्या या घटनेमुळे हादरलेल्या पालकांनी तात्काळ त्याला अँटॉप हिल पोलीस ठाण्यात आणले व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 

पोलिसानी तात्काळ गुन्हा दाखल करून पीडित मुलाच्या सांगण्यावरून आरोपीचा शोध घेऊन त्याच्या अँटॉप हिल परिसरातून त्याच्या मुसक्या आवळून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी अटक आरोपी विरुद्ध लैगिंक अत्याचार, पोक्सो आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासता संशयित आरोपी याच्यावर यापूर्वीचे अशाच प्रकारचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली असून याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा