पिस्तुलासह सेल्फी घेताना गोळी सुटली आणि…

पिस्तुलासह सेल्फी घेताना गोळी सुटली आणि…

घरातील भरलेले पिस्तुल स्वतःच्या डोक्यावर ठेवून सेल्फी काढण्याचा मूर्खपणा एका मुलाच्या जीवावर बेतला. उवेश अहमद हा १४ वर्षांचा मुलगा घरात खेळत असता त्याच्या हाती घरातील भरलेले पिस्तुल लागले. त्याने ते स्वतःच्या डोक्यावर ठेवून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ट्रिगर खेचला जाऊन गोळी त्याच्या डोक्यात शिरली आणि तो जागीच गतप्राण झाला.

उवैश अहमद हा मुलगा त्याच्या मोठा भाऊ सुहेल अहमद (१९) सोबत घरी होता. शेंगदाणे खायचे म्हणून त्याचा मोठा भाऊ सुहेल दुकानात विकत घेण्यासाठी निघून गेला. घरी एकटाच असणारा उवैश घरात इकडे तिकडे उनाडक्या करत असताना त्याने घरात भरलेल्या बंदुकीशी छेडछाड सुरू केली, डोक्याला लावून तो सेल्फी पोझमध्ये भाऊ परत येण्याची वाट पाहत तसाच उभा होता. अचानक मस्ती करता करता बंदुकीतून गोळी सुटली ती थेट त्याच्या डोक्याला लागली, आणि जागीच त्याचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

न्यूझीलंडने चिवट झुंज देत पराभव टाळला

या वयात ही परिस्थिती पाहावी लागल्याने निराशेतून पवारांचे ‘ते’ विधान

महसूल गुप्तचर संचालनालयाने आवळल्या आयफोन तस्करांच्या मुसक्या

शिवसेना आमदार रमेश कोरगावकर यांची ‘कोरिओग्राफी’

 

मेरठच्या लिसारी गेट परिसरात शनिवारी ही घटना घडली. सुरुवातीला, तिसर्‍याच व्यक्तीने त्या मुलाची गोळ्या झाडून हत्या केली आणि पळून गेल्याची अफवा सगळीकडे पसरली होती. परंतु पोलिसांनी तपास केल्यावर समजले की, मुलाच्या हातून चुकून ट्रिगर ओढल्याने त्याचा मृत्यू झाला. ‘ सुहेलला म्हणजेच त्याच्या मोठ्या भावाला अलीकडेच एका चोरीच्या खटल्यात तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. बंदुक कदाचित त्याच्या मालकीची असावी. उवैशला हे शस्त्र कसे मिळाले याचा तपास सुरू आहे’, असे सर्कल ऑफिसर अरविंद चौरसिया यांनी सांगितले आहे. दरम्यान, मुलाच्या वडिलांनी सांगितले की, ” माझ्या मुलाचे कोणतेही वैर नव्हते आणि या दुःखद घटनेनंतर मी पूर्णपणे शोकग्रस्त आहे.

Exit mobile version