प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एका तरुणाने व्हिडीओ पोस्ट करत सलमान खान याला धमकी दिली होती. यानंतर पोलिसांनी राजस्थानमधून तरुणाला अटक केली आहे. बिश्नोई गँगचे नाव व्हिडीओमध्ये घेतल्याने खळबळ उडाली होती.
सलमान खान याला २५ वर्षीय तरुणाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बनवारीलाल लातुरलाल गुजर असं या तरुणाचं नाव असून त्यानं युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करत धमकी दिली. काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाला होता यामुळे त्या धमकीच्या मेसेजनंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी राजस्थानमधून या तरुणाला अटक केली आहे.
युट्यूबवर व्हिडीओ शेअर करुन दिली धमकी मुंबई सायबर पोलिसांनी बनवारीलाल लातुरलाल गुजर या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यानं ‘अरे छोडो यार’ या नावाच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने बिश्नोई गँगचा आणि सलमान खानला जीवे मारण्याच्या प्लॅनचा उल्लेख केला. मुंबई गुन्हे शाखेने आरोपी बनवारीलाल लातुरलाल गुजर याला राजस्थानच्या बोर्डा गावातून अटक केली. पुढील तपासासाठी त्याला मुंबईत घेऊन जाणार असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेने एएनआयला दिली आहे.
हे ही वाचा..
वक्फ बोर्ड कायदा संपवावा, जमिनीवर हिंदूंसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये बांधावीत!
धक्कादायक: सलूनमध्ये मुस्लिम न्हाव्याने ग्राहकाच्या चेहऱ्याची केली ‘थुंकीने मालिश’!
अमर्याद संपत्ती गोळा करणाऱ्या वक्फ बोर्डाला चाप लावणार कोण?
‘तृणमूल काँग्रेसला मते मिळालेल्या भागातच विकासकामांसाठी पैसा’
सलमान खान याच्या घराबाहेर १४ एप्रिल रोजी दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोई याने घेतली. अभिनेता सलमान खान हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असून अनेक वेळा सलमान खान आणि त्याचे वडील सलिम खान यांना लॉरेन्स बिश्नोई कडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.