26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाबनावट सोने विकून भामट्यांनी घेतले लाखोंची कर्ज

बनावट सोने विकून भामट्यांनी घेतले लाखोंची कर्ज

नकली दागिने विकून लाखोंचे कर्ज

Google News Follow

Related

महाराष्ट्रात सध्या बनावट सोन्याची विक्री करून अथवा चोरी करून लुबाडण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. बेळगावमध्ये अशाच ‘गोल्डन गँग’च्या काही चोरांचे चिकोडी आणि सदलगा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही गोल्डन गँग बँका व सहकारी सोसायट्यांमध्ये बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज घेऊन फरार होत असल्याचे आढळून आले. ‘गोल्डन गँग’ने नऊ कर्ज देणाऱ्या बँका व सोसायट्यांना लाखोंचा गंडा घातल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित सहा जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरु आहे.

तसेच या चौकशीमधून फसवणुकीचा मोठा आकडा समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बिरेश्वर को-ऑप सोसायटीने तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. अमूल गणपती पोतदार आणि पप्पू मदनलाल जांगीड या मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी जांगीड हा राजस्थानचा रहिवासी असून, उर्वरित आरोपी हे कोल्हापूर इचलकरंजी येथील रहिवासी आहेत. ताब्यात घेतलेल्या या आरोपींकडून कोणत्या सोसायटीतून किती रक्कम उचलली याचा तपास सुरू आहे. या चौकशीमधून फसवणुकीचा मोठा आकडा समोर येण्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या हे सहा जण मुख्य संशयित दोन आरोपींना कर्ज देण्यासाठी मदत करत असल्याचे समोर आले. तसेच हे सर्वजण बँकेच्या पूर्वीपासूनच्या खातेदारांना हेरत असत. खातेधारकाला कमिशनचे आमिष दाखवून, ‘तुला इतके सोने देतो. यावर आम्हाला इतके कर्ज मिळवून दे’, असे सांगत बँकेत जुन्या खातेधारकाला नकली सोने देऊन, गोल्डन गँग कर्ज मिळवून घेत असे.

हे ही वाचा:

लाचार माजी मुख्यमंत्र्याच्या संतापाला विचारतो कोण?

न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी घेतली नव्या सरन्यायाधीश पदाची शपथ

‘खोक्या’बद्दल लवकरच सुप्रिया सुळेंना नोटीस देण्याची तयारी

दिल्ली, उत्तर भारतासह नेपाळमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के

संशयित आरोपींनी एकसंबा येथील बिरेश्वर सोसायटीत असे बनावट सोने ठेवून दोन लाख ७५ हजारांचे कर्ज घेतले होते. सोसायटीमध्ये ठेवीसाठी दिलेल्या सोन्याची सत्यता पुन्हा तपासली असता तेव्हा हे सोने बनावट असल्याचे आढळून आले. कर्जदार दादासाहेब दत्तू तिलक यांच्या नावाने हे कर्ज सोसायटीने दिल्याचे समजते. तिलक यांच्या विरोधात सोसायटीचे व्यवस्थापक आनंद कमते यांनी खातेदाराबाबतची माहिती सदलगी पोलिस ठाण्यात दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा