अमृता फडणवीसांना धमकावणाऱ्या अनिल जयसिंघानीच्या मुसक्या आवळल्या

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

अमृता फडणवीसांना धमकावणाऱ्या अनिल जयसिंघानीच्या मुसक्या आवळल्या

बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक करण्यात आल्याची मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा जयसिंघानी याच्याव आरोप आहे. मुबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जयसिंघानी याला गुजरातध्ये अटक केली आहे. थोड्याच वेळात अनिल जयसिंघानीला घेऊन पोलिस मुंबईत दाखल होणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिला अटक करण्यात आली होती. त्यानंतर अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आली आहे.

अनिक्षा जयसिंघानी ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यानंतर अमृता फडणवीस यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अनिक्षा जयसिंघानी हिला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली आहे. अनिल जयसिंघानी हा फरार होता. अखेर त्याला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले आहे. १० कोटींची खंडणीही अमृता फडणवीस यांच्याकडे मागण्यात आली होती.

अमृता फडणवीस यांच्याशी २०१६-१७ मध्ये अनिक्षाशी ओळख झाली होती. त्यानंतर २०२१ मध्ये अनिक्षा पुन्हा अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आली. त्यांनी अमृता फडणवीस यांचा विश्वास जिंकला. अनिक्षाने अमृता फडणवीस यांना मदत करण्याची विनंती केली. मात्र अमृता फडणवीस यांनी नकार दिल्यानंतर त्यांनी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचं प्रयत्न केला होता. यानंतर अमृता फडणवीस यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हे ही वाचा:

पंजाबमध्ये योगी आदित्यनाथ असते तर गुन्हेगारी संपली असती!

लंडनमध्ये भारतीय दुतावासातील कर्मचाऱ्याने खलिस्तानी समर्थकांना शिकवला धडा

प्रकाश सुर्वे यांचा बॅनर काढल्यावरून भाजपा कार्यकर्त्याला मारहाण, रुग्णालयात उपचार सुरू

ठाकरे गटातील कोणत्या नेत्यांचे श्रीलंका, सिंगापूर आणि लंडनमध्ये हॉटेल्स

फडणवीस यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अनिक्षा जयसिंघानीला अटक केली. त्यानंतर आता त्याचे वडील बुकी अनिल जयसिंघानी यालाही गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, आसाम आणि गोवा या सहा राज्यांमध्ये एकूण १७ गुन्हे अनिल जयसिंघानीवर दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये पोलीस अनिल जयसिंघानी यांचा शोध घेत होते. आहेर गुजरातमधून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

Exit mobile version