31 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरक्राईमनामाआयपीएल मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून अनिल जयसिंघानीला अटक

आयपीएल मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीकडून अनिल जयसिंघानीला अटक

अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचाही आरोप

Google News Follow

Related

इंडियन प्रीमियर लीगशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) संशयित बुकी अनिल जयसिंघानी याला अटक केली आहे. अ ईडीच्या च्या अहमदाबाद युनिटने १०,००० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यातून अटक केली आहे असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा कट आणि लाच देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी जयसिंघानी आणि त्यांची मुलगी अनिक्षा यांना नुकतीच अटक केली होती .

ईडीच्या अहमदाबाद कार्यालयाने शुक्रवारी वॉरंटसह मुंबई न्यायालयात धाव घेतली आणि जयसिंघानी यांना ताब्यात घेतले. पीएमएलए कायद्यांतर्गत अंतर्गत तपास एजन्सीने त्याच्या कोठडीची मागणी केली. जयसिंघानी यांच्याविरुद्ध अहमदाबाद कोर्टाने यापूर्वी जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटवर ईडी कारवाई करत होती. हे वॉरंट २०१५ मध्ये आयपीएल सामन्यांमध्ये कथित सट्टेबाजीच्या चौकशीच्या संदर्भात जारी करण्यात आले होते. फेडरल एजन्सी या प्रकरणाची चौकशी करत आहे.जयसिंघानी यांना शुक्रवारी ताब्यात घेतल्यानंतर एजन्सी या प्रकरणात त्यांचे जबाब नोंदवत असल्याचे समजते.

जयसिंघानी हा सट्टेबाज मुंबईजवळील उल्हासनगरचा असून तो १५ पेक्षा जास्त अधिक प्रकरणांमध्ये आरोपी आहे आणि सट्टेबाजी प्रकरणात त्याला तीन वेळा अटक झाली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दाखल केलेल्या खंडणी आणि लाचखोरीच्या प्रकरणात त्याच्या “बेकायदेशीर” अटकेला आव्हान देणारी बुकी अनिल जयसिंघानीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.

हे ही वाचा:

“राहुलला शिक्षा ठोठावणाऱ्या जजची जीभ कापू”

हुगळीत धावणार देशातील पहिली पाण्याखालून जाणारी मेट्रो

अजित पवारांनी संजय राऊतना पाडले तोंडघशी; ईव्हीएम रद्द करण्याबाबत व्यक्त केले वेगळेच मत

दिल्लीवरून डेहराडूनला जा फक्त २ तासांत

न्यायमूर्ती एएस गडकरी आणि न्यायमूर्ती पीडी नाईक यांच्या खंडपीठाने ही याचिका गुणवत्तेपासून वंचित असल्याचे निरीक्षण देऊन फेटाळून लावले.जयसिंघानी यांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. जयसिंघानी याने १९ मार्च रोजी आपल्याला बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली होती, परंतु कायद्यानुसार आपल्याला २४ तासांच्या आत न्यायालयात हजर करण्यात आले नाही, असा दावा करणारी याचिका दाखल केली होती. जयसिंघानीचे वकील मृगेंद्र सिंग आणि मन्नान संघाई यांनी जयसिंघानी यालाल अटक झाल्यानंतर ३६ तासांनी मुंबईतील सत्र न्यायालयात हजर केलं असा युक्तिवाद केला होता . जयसिंघानीला मध्य प्रदेश पोलिसांनी अलीकडेच दारूच्या कथित अवैध व्यापार प्रकरणी ताब्यात घेतले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा