विमानांना बॉम्बने उडवले जाणार असल्याच्या धमक्या वारंवार मिळत असून याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून न्यूयॉर्कमधील जेएफके आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने एअर इंडियाच्या AI 119 या प्रवासी विमानाने पहाटे म्हणजेच २ वाजताच्या सुमारास प्रवास सुरू केला. या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी सोशल मीडियावरून आली आणि तातडीने हे विमान दिल्लीकडे रवाना करण्यात आले. सध्या या विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान आता एअर इंडियाच्या विमानानंतर इंडिगोच्या विमानांनाही धमकी मिळाली आहे. दोन विमानांना बॉम्बने उडविले जाईल, अशा आशयाची धमकी मिळाली आहे. मुंबईहून जेद्दाह आणि मस्कतला जाणाऱ्या इंडिगोच्या दोन फ्लाइटमध्ये बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. यानंतर विमानांची तपासणी केली जात आहे.
इंडिगोच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून मस्कटला जाणारे इंडिगो फ्लाइट 6E-1275 आणि मुंबईहून जेद्दाहला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E-56 ला बॉम्बची धमकी मिळाली होती. प्रोटोकॉलनुसार, विमान वेगळ्या ठिकाणी हलवण्यात आले आणि मानक कार्यप्रणालीनुसार अनिवार्य सुरक्षा तपासणी ताबडतोब सुरू करण्यात आली. विमानतळ सुरक्षा दल, बॉम्ब निकामी पथक आणि इतर संबंधित यंत्रणांचा या प्रक्रियेत सहभाग होता. संभाव्य धोका टाळता यावा यासाठी विमानांची कसून तपासणी केली जात आहे. सुरक्षा तपासणीदरम्यान सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले.
IndiGo flight 6E 56 operating from Mumbai to Jeddah received a bomb threat. As per protocol, the aircraft was taken to an isolated bay, and following the standard operating procedures, mandatory security checks were promptly initiated: Indigo Spokesperson https://t.co/okfUhrdQ63
— ANI (@ANI) October 14, 2024
इंडिगोने म्हटले आहे की, प्रवाशांच्या सुरक्षेला आपले प्राधान्य असून प्रवाशांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी सर्व पावले उचलली जात आहेत. विमान कंपन्या आणि विमानतळ कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना योग्य माहिती आणि मदत दिली जात आहे. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही धमकी कोठून आणि कोणी दिली याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हे ही वाचा:
महायुती सरकारचा मोठा निर्णय; मुंबईकर झाले ‘टोल’मुक्त!
उत्तर प्रदेशमध्ये दुर्गा मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीत हिंसाचार; एकाचा मृत्यू
ट्रम्प यांच्या कॅलिफोर्नियाच्या कोचेलामधील रॅलीजवळून सशस्त्र व्यक्तीला अटक
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी हत्येत रियल इस्टेटमधील बड्या विकासकाच्या नावाची चर्चा
यापोरोवी एअर इंडियाच्या मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानालाही बॉम्बची धमकी मिळाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. यापूर्वीही अनेक विमानतळांना आणि विमानांना बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. जवळपास सर्वच अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे.