मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची पुन्हा धमकी; एकाला अटक

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची पुन्हा धमकी; एकाला अटक

पुन्हा एकदा मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली. मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती फोनवरून देणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या घोरपडी भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला नंतर मुंबई पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली.

शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीला मुंढवा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मुलाला शाळेत एडमिशन मिळाले नाही म्हणून गृहविभागाला त्याने धमकीचा फोन केला होता.

हे ही वाचा:

पत्र ‘प्रताप’ केवळ स्वार्थापोटी

अविनाश भोसलेंची ४० कोटींची संपत्ती सील

मुख्यमंत्री म्हणून नव्हे; बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून चर्चा केली

फडणवीसांचा ई टेंडरिंगचा निर्णय ठाकरे सरकारने बदलला

शैलेश हा घोरपडी पुणे येथील राहणारा आहे. या संदर्भातील मेल सायंकाळी ६.२० वाजता प्राप्त झाला, अशी माहिती देण्यात आली. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत…

मंत्रालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या मागील पंधरा दिवसात धमकीच्या दोन घटना घडल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी एकाने फोन करून मंत्रालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या फोन नंतर सोमवारी सायंकाळी मंत्रालयाला धमकीचा मेल आहे. या दोन्ही घटना अफवा असल्याचे समजते.

रविवारी मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा मेल आला आणि त्यामुळे मोठी खळबळ उडाली. ३० मे रोजी अशाच एका अज्ञात व्यक्तीने मंत्रालयात दूरध्वनी करून बॉम्ब ठेवल्याचा इशारा दिला होता.

या घटनेमुळे मंत्रालयात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी मंत्रालयातील सुरक्षा विभागाला धमकीचा मेल आला. त्यानुसार बॉम्बशोधकपथकाने मंत्रालय परिसर पिंजून काढला.

Exit mobile version