24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामामुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याचा पोलिसांना फोन!

मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याचा पोलिसांना फोन!

या प्रकरणी दिल्लीमधून एकाला अटक

Google News Follow

Related

मुंबईतील नामंकित आणि प्रसिद्ध असलेल्या ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असून हॉटेलमध्ये स्फोट घडवून आणणार आहे अशी धमकी एका अज्ञाताने फोनद्वारे पोलिसांनी दिली.या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबईत घातपाताची धमकी देण्याचे सत्र सातत्याने सुरू आहे.मागील महिन्यात मंत्रालयात बॉम्ब ठेवला असून मंत्रालय उडवून देण्याची धमकी आली होती.यानंतर, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी शोधमोहीम राबवली असता, धमकीचा फोन अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे नावाच्या व्यक्तीने केल्याचं आढळून आलं. त्यानंतर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, १४ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० च्या सुमारास एका व्यक्तीने मुंबई फायर ब्रिगेड कंट्रोलला फोन करून ताजमध्ये बॉम्ब ठेवल्याचं सांगितलं.ताज हॉटेल मध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट करणार असून तुम्हाला हवे ते करा, अशी धमकी त्याने फोनवर दिली.

हे ही वाचा:

इराणचा इशारा; गाझावरील हल्ले इस्रायलने थांबवावेत नाहीतर….

भारतापुढे पाकिस्तानची दाणादाण, भारताचा आठवा वर्ल्डकप विजय

प्रशांत किशोर यांनी दिले नीतिश कुमारांना आव्हान

इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये हमासच्या एरियल फोर्सचा प्रमुख ठार

अग्निशमन दलाने मुंबई पोलिसांना तात्काळ याची माहिती दिली. तात्काळ पोलीस आणि बॉम्ब शोधक आणि नाशक पथक ताज हॉटेल परिसरात दाखल झाले. पोलिसांनी ताज हॉटेलची तपासणी केली मात्र तासाभरानंतरही काहीही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर बीकेसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून तरूणावर गुन्हा दाखल केला आहे.

अटक करण्यात आलेला नवी दिल्ली येथील लक्ष्मीनगर भागातील रहिवासी असून धरमपाल सिंह (३६ वर्षे) असे त्याचे नाव आहे.पोलिसांना माहिती मिळताच त्याला अटक करून चौकशी सुरु केली. त्याने फायर ब्रिगेड कंट्रोलला कॉल करण्यापूर्वी २८ वेळा मुंबई पोलिस कंट्रोलला कॉल केल्याचे दिसून आले.त्यांनतर मुंबईच्या कुलाबा पोलिसांनी कॉलरवर आयपीसीच्या कलम ५०६(२) अन्वये गुन्हा दाखल केला आणि कॉलरला दिल्लीतून अटक केली. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत असून फोन करणाऱ्याने व्यक्तीने असा फोन का केला याचा शोध घेत आहेत.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा