मुंबईतल्या ललित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबईतल्या ललित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई शहर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचं सध्याचं चित्र आहे. दरम्यान, मुंबईतील ललित हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर मुंबईमधील यंत्रणा अलर्टवर आल्या आहेत. सोमवार, २२ ऑगस्ट रोजी फोनवरून हा इशारा देण्यात आला आहे.

ललित हॉटेल उडवणारी धमकी देणाऱ्या व्यक्तीने हॉटेमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे त्या व्यक्तीने सांगितले आहे. तसेच हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले बॉम्ब निकामी करण्यासाठी अज्ञात व्यक्तीकडून पाच कोटींच्या खंडीणीची मागणी करण्यात आली आहे. यानंतर हॉटेल प्रशासनाकडून पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी कलम ३८५, ३३६ आणि कलम ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, रशियाने काल एका दहशतवाद्याला ताब्यात घेतलं असून त्याने भारतावर एक मोठा आत्मघातकी हल्ला होणार होता, अशी कबुली दिली आहे.

हे ही वाचा:

विधानभवनाजवळ शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचे ४१ व्या वर्षी निधन

जागतिक वडापाव दिन: मुंबईची ओळख असणाऱ्या वडापावचा जन्म कसा झाला झाला?

डान्सर सपना चौधरीला होणार अटक?

शनिवार, २० ऑगस्ट रोजी पोलिसांना मुंबईवर २६/११ सारखा हल्ला होणार असल्याचा मेसेज आला होता. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. तसेच ज्या नंबरवरून हे मेसेज आले तो नंबर पाकिस्तानचा असल्याचे समोर आले होते. तर दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात एक अज्ञात बोट शस्त्रांसह सापडली होती. त्यामुळे यंत्रणा अधिक अलर्ट मोड वर आल्या होत्या.

Exit mobile version