काबूलमध्ये शाळेत आत्मघाती बॉम्बस्फोट, शंभर मुलांचा मृत्यू

काबूलमध्ये शाळेत आत्मघाती बॉम्बस्फोट, शंभर मुलांचा मृत्यू

अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीत बॉम्बस्फोटांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अफगाणिस्तानातील काबूल येथील एका शाळेत भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. आत्मघाती बॉम्बस्फोटात किमान शंभरहुन अधिक मुलांचे प्राण गेले आहेत. एका स्थानिक पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत मारले गेलेले बहुतांश विद्यार्थी हजारा आणि शिया होते. हजारा हा अफगाणिस्तानातील तिसरा सर्वात मोठा वांशिक गट आहे.

शहराच्या पश्चिमेला असलेल्या दश्त-ए-बरची भागातील काझ एज्युकेशन सेंटरमध्ये हा स्फोट झाल्याचे बीबीसीने वृत्त दिले आहे. स्थानिक पत्रकार बिलाल सरवारी यांनी ट्विट केले की, आतापर्यंत त्यांच्या शंभर विद्यार्थ्यांचे मृतदेह मोजले गेले आहेत. मृत विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे. वर्ग भरला होता. विद्यार्थ्यांची परीक्षे सुरु होती. त्यामुळे वर्ग मुलांनी खचाखच भरला होता. हा स्फोट इतका भीषण होता की, विद्यार्थ्यांचे हात पाय विखुरले होते.

शाळेतील एका शिक्षकाला मुलांचे मृतदेह उचलताना पाहिल्याची भीषणता सांगितली. हा स्फोट एवढा जोरदार होता की, अनेक मुलांच्या शरीराचे तुकडे झाले. स्फोटापूर्वीचा एक व्हिडिओही ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसचा अध्यक्ष, अध्यक्ष खेळ सुरूच

नवरात्र २०२२ : कामाख्या मंदिराचे तेजच निराळे

देशात शांतता संविधानामुळे नव्हे, तर हिंदूंमुळे

मुंबई विमानतळावर महिलेकडून कोकेन जप्त

पोलिस प्रवक्ते खालिद झद्रान यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असताना एका आत्मघाती हल्लेखोराने या शैक्षणिक केंद्रावर हल्ला केला. याआधीसुद्धा ऑगस्टमध्ये काबूलमध्ये शाळेमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटांमुळे अनेक जणांचे मृत्यू झाले होते.

Exit mobile version