पश्चिम बंगालच्या दुर्गापूर भागात शनिवारी (१६ ऑक्टोबर) रात्री दुर्गा विसर्जनासाठी गेलेल्या भाविकांवर बॉम्ब फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही लोकांनी यावेळी हल्ला करत गाड्यांची तोडफोडही केली. दुर्गापूरच्या अन्नपूर्णा भागात दुर्गा विसर्जनावेळी हा प्रकार घडला. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करत आहेत. देशी बनावटीचा बॉम्ब फेकल्यानंतर मोठा आवाज झाल्याने लोकांमध्ये गोंधळ उडाला होता.
दुर्गापूरच्या अन्नपूर्णा परिसरात शनिवारी रात्री दुर्गा विसर्जन करून काही लोक परतत असताना काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. जेव्हा एक गट मूर्ती विसर्जन करून परत येत होता तेव्हा दुसऱ्या गटाने त्यांना रस्त्यात अडवून दारुसाठी पैसे मागितले. यावरून दोन्ही गटांमध्ये भाडंण झाले आणि पुढे मारहाणसुद्धा झाली, असे वृत्त आहे.
West Bengal: A group of people hurled crude bombs and vandalised vehicles after immersion of Goddess Durga idol in Annapurna area of Durgapur yesterday
"Some people have sustained minor injuries. We're trying to identify the attackers," said ACP (East) Dhrubjyoti Mukherjee pic.twitter.com/T8RPpf889b
— ANI (@ANI) October 17, 2021
दोन्ही गटांमधील वाद विकोपाला गेल्यावर एका गटातील लोकांनी बॉम्ब फेकल्याची माहिती मिळाली. बॉम्बच्या मोठ्या आवाजाने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तसेच त्यावेळी वाहनांची तोडफोडसुद्धा करण्यात आली. हल्लेखोर बॉम्बफेक केल्यानंतर तिथून फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
हे ही वाचा:
काँग्रेस नेता म्हणाला, इस्लामिक अजेंडा राबवला जातोय!
भारतातील बैठकीसाठी पाकिस्तानलाही दिले निमंत्रण
जागतिक बँक भारताच्या लसीकरणाबद्दल हे म्हणाली….
‘काँग्रेस पक्षाची अवस्था ही सर्कससारखी झाली आहे’
या घटनेनंतर पोलिसांनी लोकांना शांत करत परिस्थिती हाताळली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ‘काही लोक किरकोळ जखमी झाले आहेत. आम्ही हल्लेखोरांना शोधत आहोत,’ असे पोलीस अधीक्षक ध्रुवज्योती मुखर्जी यांनी सांगितले.