बॉलिवूड कलाकार हे वारंवार डीपफेक व्हिडीओचे शिकार बनत आहेत. रश्मिका मंदाना, कतरिना कैफ आणि नोरा फतेहीसह अनेक अभिनेत्रींनंतर अभिनेता अक्षय कुमारचा डीपफेक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी जाहिरात करताना दिसत आहे.
अक्षय कुमारचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एआयच्या मदतीने त्याचा चेहरा आणि आवाज वापरण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार म्हणत आहे की, “तुम्हाला खेळायला आवडते का? मी तुम्हाला हे ऍप डाउनलोड करण्याची आणि एव्हिएटर गेम वापरण्याची शिफारस करतो. हा जगभरातील लोकप्रिय स्लॉट आहे जो प्रत्येकजण येथे खेळतो. आम्हाला कॅसिनोविरुद्ध खेळायचे नाही, तर इतर खेळाडूंविरुद्ध खेळायचे आहे. मी स्वत: गेल्या एक महिन्यापासून दररोज हा खेळ खेळत आहे.”
प्रत्यक्षात अभिनेता अक्षय कुमार याने अशी कोणतीही जाहिरात केलेली नाही. या व्हिडिओच्या स्रोताचा तपास सध्या सुरू आहे. या बनावट सोशल मीडिया हँडल आणि कंपनीविरोधात सायबर तक्रार दाखल करण्यात आली आहे. अक्षय कुमार याने आपल्या टीमलाही या प्रकरणावर लक्ष ठेवून कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले आहे.
हे ही वाचा:
राममंदिराबाबत बीबीसीने केलेल्या पक्षपाती वार्तांकनावर ब्रिटिश खासदार संतापला
संजय राऊतांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे सादर करावेत
आडवाणीजींना भारतरत्न ही लाखो कार्यकर्त्यांना सुखावणारी बाब
आडवाणीजींना भारतरत्न देण्याची घोषणा आनंददायी
अभिनेत्री नोरा फतेहीचा एका ब्रँडची जाहिरात करतानाचा डीपफेक व्हिडिओही समोर आला होता. यापूर्वी रश्मिका मंदान्ना, कतरिना कैफ, काजोल आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकरचे डीप फेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.