28 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरक्राईमनामारुग्णालयांमध्ये बोगस फिजिओथेरेपिस्टचा 'वावर'

रुग्णालयांमध्ये बोगस फिजिओथेरेपिस्टचा ‘वावर’

नामांकित रुग्णालयात बोगस फिजिओथेरपिस्ट्चा धुमाकूळ

Google News Follow

Related

मुंबईत सध्या कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची फिजिओथेरेपी पदवी नसताना, बोगस फिजिओथेरपिस्ट्सनी धुमाकूळ घातला आहे. अनुभवाच्या जोरदार ही मंडळी मानवी जीवांशी खेळत असल्याचे चित्र काही प्रतिष्ठित रुग्णालयात सर्रासपणे चालू असलयाचे दिसून येते. या बनावट फिजिओथेरेपिस्ट्सवर नियंत्रण घालण्यासाठी सरकारी पातळीवर अजून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.

फिजिओथेरपिस्टसाठी बॅचलर ही पदवी चार वर्षांची असून, मास्टर ही पदवी तीन वर्षांची आहे. नाशिक जिल्हा फिजिओथेरपीस्टकडे नोंदी असलेले ९५ फिजिओथेरेपीस्ट आहेत. कोणत्याही फिजिओथेरपिस्टला प्रॅक्टिस करण्यासाठी मान्यताप्राप्त कॉलेजमध्ये शिक्षण बंधनकारक असते. मात्र कोणत्याही शिक्षणाची वाट न धरता बोगस प्रमाणपत्र मिळवून हे फिजिओथेरेपिस्ट अनुभवाच्या आधारे मानवी हाडांशी खेळून आपला उदरनिर्वाह करतात. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स अंतर्गत विविध पदांची भरती केली जाते.

हे ही वाचा:

नवरात्रीत धावणार मुंबई – अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का भेट घेतली रबर गर्लची?

‘सदा सरवणकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा’

‘ब्रह्मास्त्र’ हिट की फ्लॉप !

फिजिओथेरपिस्टचे काम सुरु करण्या अगोदर राष्ट्रीय, राज्य व जिल्हा लोकसभा फिजिओथेरेपिस्ट संस्थांकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. मात्र काही विद्यार्थी ह्या नोंदणीकडे लक्ष न देता थातुरमातूर प्रॅक्टिसच्या आधारे फिजिओथेरेपिस्टचे काम करत असतात. महाराष्ट्र कायदा २००४ (२) त्यानुसार, नोंदणी फिजिओथेरपिस्टखेरीज कोणतीही व्यक्ती फिजिओथेरेपीचा व्यवसाय करू शकत नाही. फक्त नोंदणीकृत व्यक्तीलाच फिजिओथेरपिस्ट म्हणून ग्राह्य धरले जाते. नामांकित मोठमोठया क्षेत्रांतही बोगस फिजिओथेरपिस्टची निवड करण्यात आलेली दिसते. या संबंधित कारभारावर कोणत्याही शासकीय किंवा सरकारी यंत्रणेचे लक्ष नसल्याने बोगस वृत्तीला चालना मिळत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा