25 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरक्राईमनामाराजकुमार हिरानी यांच्या मुलाच्या नावाने बोगस इन्स्टाग्राम खाते

राजकुमार हिरानी यांच्या मुलाच्या नावाने बोगस इन्स्टाग्राम खाते

Google News Follow

Related

प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी यांच्या मुलाचे बोगस इन्स्टाग्राम खाते उघडून फसवणूक करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चित्रपट निर्माते राजकुमार हिरानी यांचा मुलगा वीर यांच्या नावाचे अज्ञात व्यक्तीने बोगस इंस्टाग्राम खाते उघडले होते. हिरानी यांच्या आगामी चित्रपटासाठी अभिनेता आणि लहान मुलाची गरज असल्याची पोस्ट हॅकरने इंस्टाग्राम वर टाकली होती. ज्यांना चित्रपटात काम करायचे असल्यास त्यांनी संपर्क साधावा, चित्रपटात काम केल्यास वीस कोटी रुपये देऊ, तसा करारनामा करु, अशीही पोस्ट टाकण्यात आली होती.

हे ही वाचा:

गोवंडीतील उद्यानाला टिपूचे नाव द्यायला शिवसेनेचा छुपा पाठिंबा

लवकरच मोदी सरकारकडून एलआयसी आयपीओ बाबत निर्णय?

प्रतीक्षा संपली! दहावीच्या मुलांचा निकाल उद्या लागणार

गँगस्टर इक्बाल मिर्चीच्या कुटुंबाच्या संपत्तीवर टाच

गेल्या आठवड्यात राजकुमार हिरानी यांच्या कंपनीच्या ईमेलवर असाच एक मेल आला होता, त्यानंतर त्यांना सतत अशा प्रकारे मेल येत होते. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच त्यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती, या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बुधवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा अंधेरी पोलिसांसह सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा