मेळघाटात बोगस डॉक्टरांची ‘बंगाली’ जादू

मेळघाटात बोगस डॉक्टरांची ‘बंगाली’ जादू

अवघ्या देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. एकीकडे तिसरी लाट आता येऊ घातलेली आहे. असे असता मेळघाटातून मात्र एक भीषण वास्तव आता समोर आलेले आहे. अचलपूर तालुक्यासह मेळघाटातील बहुतेक गावांमध्ये आरोग्य विभाग खिजगणीततही नाही. त्यामुळे याचाच फायदा घेत मेळघाटामध्ये बोगस डॉक्टरांचे पेव फुटले आहे. याचाच परिणाम म्हणून मेळघाटातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हे बहुतांशी डॉक्टर हे बंगालमधून आलेले आहेत. तसेच यासंदर्भात तक्रार करूनही आरोग्य समित्या मात्र सोयीने याकडे दुर्लक्ष करत आहेत.

सध्याच्या घडीला अचलपूर तालुक्यात बोगस डॉक्टरांची संख्या ५० पेक्षा जास्त आहे, तर मेळघाटातही बोगस डॉक्टरांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमधून आलेल्या बोगस डॉक्टरांची संख्या अधिक आहे. सध्या कोरोना काळात ताप, सर्दी, खोकला असलेल्या कोरोना संशयित रुग्णांवर पॅरेसिटेमॉल सारख्या गोळ्या देऊन हे डॉक्टर बिनधास्तपणे उपचार करीत असल्याचे नागरिक सांगतात. कोरोनाची भीती म्हणून अनेकदा रुग्णही मोठ्या रुग्णालयात जाणे टाळतात. मुख्य म्हणजे यासंबंधी तक्रार करूनही याबाबत कारवाई होताना दिसत नाही. गावातील काही राजकीय लोकांच्या मदतीने अशा बोगस डॉक्टरांना पाठीशी घातले गेले.

हे ही वाचा:

तिरुपती देवस्थान समितीवर मिलिंद नार्वेकर कसे चालतात?

काळजी घेणाऱ्या इसमामुळेच ते कुटुंबीय पडले काळजीत; काय घडले?

ब्रम्हांडातील बेस्ट मुख्यमंत्र्यांचे नाव प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत नाही?

वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा टी-२० कर्णधार

सध्या ग्रामीण भागात जसा कोरोना वाढू लागला तसा या लोकांचा गल्लासुद्धा वाढत आहे. कोरोनाच्या भीतीने ग्रामीण भागातील नागरिक शासकीय किंवा चांगल्या दवाखान्यात जाण्यास टाळाटाळ करतात आणि याचाच फायदा घेत हे बोगस डॉक्टर आता कोरोना संशयितांवरसुद्धा उपचार करीत आहेत. लोकांना आपल्यावर विश्वास बसावा म्हणून या बंगाली डॉक्टरांनी आपली नावेही त्याच अनुषंगाने बदलली आहेत.

Exit mobile version