मिस्टर इंडिया मनोज पाटील याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विषारी गोळ्या खाऊन २९ वर्षीय मनोजने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. बुधवारी रात्री उशिरा कुटुंबियांनी त्याला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केलं. सध्या मनोजची तब्येत स्थिर असल्याची माहिती आहे. बॉलिवूड अभिनेता साहिल खान याच्या त्रासाला कंटाळून मनोज पाटीलने हे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मिस्टर इंडिया मनोज पाटील याने बुधवारी रात्री विषारी गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रात्री उशिरा कुटुंबियांनी त्याला कूपर रुग्णालयात दाखल केलं. सध्या मनोजची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. पुढील उपचारांसाठी त्याला कूपर रुग्णालयातचं ठेवण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून साहिल खान आपल्याला आणि आपल्या न्युट्रिशन शॉपला विनाकारण टारगेट करत असून त्याचा आपल्याला मानसिक त्रास झाल्याचं मनोज पाटीलने म्हटलंय. आपल्या व आपल्या पत्नीमधील असलेल्या वादाचा फायदा घेऊन तिच्या मदतीने आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकण्याचे कारस्थान साहिल खान करत असल्याचं मनोज पाटीलने म्हटलं आहे. त्यामुळे आपला अमेरिकेला जायचा व्हिसा रद्द होऊ शकेल असंही त्याने म्हटलं आहे.
साहिल खान एक बॉलिवूड चित्रपट अभिनेता, फिटनेस उद्योजक आणि यूट्यूबर आहे. फिटनेस जागरूकता वाढवण्यासाठी तो ओळखला जातो आणि त्याने मुंबईतील अनेक संस्थांकडून पुरस्कार पटकावले आहेत.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदी म्हणतात, उत्तर प्रदेशातील गुंडगिरीचा योगींनी अंत केला!
तब्बल १४ वर्षांनंतर त्याच्या शिक्षेत केली वाढ! काय घडले वाचा…
जान मोहम्मद हे केवळ प्यादे; मुख्य सूत्रधार मुंबईत
जालन्यात ६५ वर्षीय शेजाऱ्यानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
साहिलने त्याच्या एका म्युझिक व्हिडीओद्वारे त्याच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली होती. या गाण्याचे नाव ‘नाचेंगे सारी सारी रात’ असे होते. त्याचे हे गाणे सुपरहिट ठरले आणि त्यानंतर साहिलने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. साहिलचा ‘स्टाईल’ या चित्रपटातील अभिनय आणि त्याचा लूक चांगलाच गाजला होता. साहिल अभिनित ‘स्टाईल’ या चित्रपटामध्ये शरमन जोशी मुख्य भूमिकेत दिसला होता. ‘स्टाईल’मधून शरमन जोशीची कारकीर्द बहरली, मात्र साहिल काही खास जादू दाखवू शकला नाही.