अरेरे! ‘त्या’ अंगरक्षकाने अखेर बोट गमावले

अरेरे! ‘त्या’ अंगरक्षकाने अखेर बोट गमावले

ठाण्यामध्ये फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यामध्ये पालिका अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्या हाताची बोटे तुटली होती. त्यांच्यासह त्यांचा अंगरक्षकाचेही बोट कापले गेले होते.

कल्पिता यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्या शस्त्रक्रियेला तब्बल सात तास सुरू होती. परंतु त्यांचा अंगरक्षकाचे बोट वाचविण्यात यश आले नाही. बचावासाठी धावलेल्या सोमनाथ पालवे यांचे तुटलेले बोट जोडण्यात यश आले नाही. त्यामुळेच पालवेंच्या डाव्या अंगठ्याचे बोट हे आता कायमचे गमावलेले आहे. पालवे यांनी प्रसंगावधान राखत हल्लेखोराला त्यावेळी लाथ मारली होती. त्यामुळेच पिंपळे यांच्यावर होणारा मोठा आघात हा टळला होता.

पालवे यांच्यावर ठाणे महानगरपालिका रुग्णालयामध्ये उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. कासारवडवली येथील फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकू हल्ला केला होता. यात त्यांची दोन तर त्यांच्या अंगरक्षकाचे एक बोट कापले गेले. या घटनेनंतर त्याना तातडीने आधी घोडबंदर रोड येथील आणि त्यानंतर माजीवडा येथील रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. सोमवारी रात्री तब्बल सात तास त्यांचे बोट पुन्हा जोडण्यासाठी अवघड शस्त्रक्रिया पार पडली. पिंपळे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

हे ही वाचा:

सिद्धार्थच्या निमित्ताने नवी चिंता; युवकांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण का वाढते आहे?

असा झाला जेईई घोटाळा…

अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार

बजबजपुरी! मुंबईतील खड्डे बुजता बुजेना

शहरातील अनधिकृत फेरीवाल्याविरोधातली कारवाई यापूढेही सुरूच ठेवणार असल्याचं पिंपळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसेच शहरातील फेरीवाल्यांना त्याना आखून दिलेल्या ’हॉकर्स झोन’ मध्ये व्यवसाय करण्याची परवानगी आहे. मात्र त्याव्यतिरिक्त पदपथ अडवून धंदा करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल असंही त्या म्हणाल्या. शहरातील स्थानिक फेरीवाले अशा गोष्टी कधीही करत नाहीत. मात्र शहराबाहेरून आलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या फेरीवाल्याकडून हे कृत्य घडले आहे.

Exit mobile version