मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरावर सकाळी केंद्रीय तपास यंत्रणेने छापा मारला आणि त्यांची चौकशी केल्याचे कळते. यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी पोहोचल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचे आरोप होत आले आहेत, त्यासंदर्भात तक्रारीही करण्यात आलेल्या आहेत, त्याचाच परिणाम म्हणून ही कारवाई होते आहे का, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. ही छापेमारी आयकर खात्याने केल्याचे कळते आहे. १५ कोटींच्या एका व्यवहाराबाबत ही छापेमारी सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे.
यशवंत जाधव यांचे निवासस्थान माझगाव येथे असून त्या इमारतीचे नाव बिलखडी आहे. तिथे सकाळीच या तपास यंत्रणांचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी जाधव यांच्या घरी जाऊन चौकशी, तपास सुरू केला. इमारतीच्या खाली सीआयएसएफचे बंदुकधारी जवान उभे असून त्यांच्याकडून इमारतीतील येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. इमारतीत येणाऱ्या व्यक्तीचे सामान तपासूनच आत सोडण्यात येत आहे.
ही कारवाई नेमकी कुणी केली आहे, यासंदर्भात अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या ईडीने महाराष्ट्रातील अनेक नेत्यांवर कारवाई केल्यानंतर ही कारवाईदेखील ईडीची असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही कारवाई आयकर खात्याची आहे अशीही चर्चा आहे.
हे ही वाचा:
मध्य प्रदेशमध्ये ११ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी
सपत्निक पूजा करताना हे असतात नियम
रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी घेणार महत्वाची बैठक
यासंदर्भात भाजपाचे आमदार अमित साटम यांच्याशी टीव्ही वाहिनीने संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, मलाही आपल्यामार्फतच कळते ईडीची रेड झाली आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. ही भ्रष्टाचाराविरोधातली लढाई आहे. ३ लाख कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. स्थायी समितीत महत्त्वाचे टेंडर पास होत असतात. यशवंत जाधव हे स्थायी समितीते अध्यक्ष आहे. भ्रष्टाचाराच्या गाडीचे ड्रायव्हर हे जाधव आहेत. त्यामुळे कारवाई होत असावी. हा मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला लागलेला धक्का आहे. जे कुणी हे करत असतील त्यांना धक्का लागणारच आहे.