25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरक्राईमनामामुरजी पटेलला अटक होणार? खोट्या कागदपत्रांसह ओबीसी प्रमाणपत्र मिळविल्याबद्दल गुन्हा

मुरजी पटेलला अटक होणार? खोट्या कागदपत्रांसह ओबीसी प्रमाणपत्र मिळविल्याबद्दल गुन्हा

भाजपाचे माजी नगरसेवकाने २०१७ला लढविली होती पालिकेची निवडणूक

Google News Follow

Related

भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्याविरोधात खोटी कागदपत्रे सादर करत इतर मागासवर्गीय तथा ओबीसीचे जात प्रमाणपत्र मिळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकी वेळी मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व प्रभाग क्रमांक ८१ मधून भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांनी निवडणूक लढवली होती. निवडणूक लढताना लेवा पाटील जातीचे प्रमाणपत्र त्यांनी वापरले मात्र जात प्रमाणपत्र पडताळणी वेळी हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे सिद्ध झाल्याने वांद्रे महानगर दंडाधिकारी, न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईच्या शाहूनगर पोलीस ठाण्यात मुरजी पटेल यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाय त्यांनी निवडणूक अर्जासोबत जात प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी वडिलांच्या शाळा सोडल्याचा दाखला व जन्म प्रमाणपत्र दिले होते ते देखील बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने मुरजी पटेल यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मुरजी पटेल यांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या शाहूनगर पोलिस मुरजी पटेल यांच्या विरोधात अधिक तपास करत आहेत.

हे ही वाचा:

आता तुम्हीच आमचे रक्षण करा!

लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या होणार जाहीर!

मुंबईतील रस्ते कामाचा दहावीच्या विद्यार्थ्यांना फटका!

सर्वेक्षणानुसार एनडीए ४०० पार करणार!

मिलिंद भानुदास पाटील यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. देखरेख समितीला पटेल यांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचा संशय आला. तीन सदस्यीय समितीने या प्रकरणाची चौकशी केली. पटेल यांनी वडिलांचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला सादर केला होता. पण चौकशीत मुरजी यांच्या वडिलांना शाळा सोडल्याचा दाखला कुठून मिळाला हे स्पष्ट होऊ शकले नाही.

या समितीतील अधिकाऱ्याने सांगितले की, सर्वसाधारणपणे शाळा बंद झाली तरी त्यांची कागदपत्रे शेजाऱच्या शाळेत असतात. पण मुरजी यांच्या वडिलांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याबाबतचे कोणतेही कागद सापडले नाहीत. त्यानंतर हे आढळले की, हा शाळा सोडल्याचा दाखला ८ जून १९९७ला दिला गेला होता. पण तो रविवार होता. त्यानंतर आणखी चौकशी करण्यात आली. तेव्हा मुरजी यांच्या आजोबांचे नाव लिरा अंबालाल पटेल असे नमूद करण्यात आले होते तर आजीचे नाव जसूबाई होते. पण आरोग्य खात्याकडे चौकशी केल्यावर मुरजी यांच्या आजोबांचे नाव लिंबा अंबाजी आणि आजीचे नाव सावित्रीबाई असल्याचे आढळले. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाच्या म्हणण्याप्रमाणे हा गुन्हा दाखल केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा